एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राचा लोकमान्य टिळकांवर चित्ररथ
![प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राचा लोकमान्य टिळकांवर चित्ररथ Lokmanya Tilaks Chitrarath In 26 January Parade प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राचा लोकमान्य टिळकांवर चित्ररथ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/16182358/Republic-Day-parade-Maharashtra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 26 जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये लोकमान्य टिळकांवर चित्ररथ साकारण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये सर्व राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. यावर्षी महाराष्ट्राकडून लोकमान्य टिळकांवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.
लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!" अशी सिंहगर्जना केली होती. या सिंहगर्जनेचं सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यामुळे या चित्ररथातून लोकमान्य टिळकांना आदरांजली देण्यात येणार आहे.
2016 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रोटेशन पद्धतीमुळे महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला नव्हता. त्यामुळे येत्या जानेवारीमध्ये लोकमान्यांच्या सिंहगर्जनेवर आधारित चित्ररथ साकारला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे सर्वांचंच लक्ष असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)