एक्स्प्लोर

गोमंतकीयांना 1 फेब्रुवारीपासून कॅसिनोवर नो एन्ट्री

मांडवी नदीत पाच कॅसिनोमध्ये देश-विदेशातील पर्यटकांबरोबरच हजारो गोमंतकीयही जातात. मात्र कॅसिनोमुळे अनेकांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून गोवेकरांना 1 फेब्रुवारीपासून कॅसिनोवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी : राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंमध्ये जाण्यास गोमंतकीयांना येत्या 1 फेब्रुवारीपासून बंदी असणार आहे. सरकारने गेमिंग कमिशन स्थापन करण्याचे ठरवले आहे. त्याविषयीची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून सुरु होणार आहे. मांडवी नदीत पाच  कॅसिनोंमध्ये देश-विदेशातील पर्यटकां बरोबरच हजारो गोमंतकीय देखील जात असतात. अनेकांना कॅसिनोचे व्यसन लागले आहे. अनेकांची कुटुंबे कॅसिनोमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यास बंदी लागू करावी अशी मागणी लोकांबरोबरच आमदार आणि काही मंत्र्यांकडून  केली जात होती. कळंगुट मतदारसंघाचे आमदार तथा बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बुधवारी (29 जानेवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. गोमंतकीयांना कॅसिनोमध्ये जाण्यास बंदी लागू करायला हवी, अशी मागणी लोबो यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. गोवा विधानसभेतही 2019 साली याविषयी आश्वासन दिले गेले होते पण त्याची पूर्तता कधी झाली नव्हती. कॅसिनोंवर रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मांडवी नदीतून कॅसिनो हटवले जावेत अशी मागणीही काही आमदार करत आहेत. मात्र सरकार तूर्त गोमंतकीयांना बंदी लागू करण्याच्याच विषयावर लक्ष देईल, असे सूत्रांनी सांगितले. हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल (30 जानेवारी) याची अधिकृत घोषणा केली. गोव्याचे वाणिज्य कर आयुक्त हेच गेमिंग कमिशनर म्हणून काम पाहतील. आपण त्याविषयीच्या फाईलवर प्रक्रिया सुरु केली आहे. गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यापासून बंदी लागू होईल. 1 फेब्रुवारीपासून बंदीची अंमलबजावणी गेमिंग कमिशनर करुन घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कॅसिनोंमध्ये जे कुणी जातील त्यांचे ओळखपत्र मागण्याचा अधिकार हा गेमिंग कमिशनरला असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Police LOC Alert : मोठी बातमी! अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका विरोधात लूकआऊट नोटीस जारी, CJP चे तिन्ही नेते मुंबई पोलिसांच्या रडारवर
मोठी बातमी! अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका विरोधात लूकआऊट नोटीस जारी, CJP चे तिन्ही नेते मुंबई पोलिसांच्या रडारवर
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
Paternity Leave : बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह, मुख्यमंत्री विजय यांची मोठी घोषणा
बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह, मुख्यमंत्री विजय यांची मोठी घोषणा
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Embed widget