PM Modi-Rishi Sunak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे अभिनंदन केले. तसेच जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास ते उत्सुक असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी ट्वीट करून असे म्हणाले आहेत. 


पंतप्रधान मोदी ट्वीट करून म्हणाले की, “ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहात, मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटिश भारतीयांना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा. आपण ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे. तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे की, सहकारी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने आणि नेतेपदी निवड झाल्याने ते कृतज्ञ आहेत. ही जबाबदारी ते नम्रतेने स्वीकारतात, असं ते म्हणाले आहेत. तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे की, सहकारी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने आणि नेतेपदी निवड झाल्याने ते कृतज्ञ आहेत. ही जबाबदारी ते नम्रतेने स्वीकारतात, असं ते म्हणाले आहेत.


दरम्यन, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनून नवा इतिहास रचणार आहेत. दिवाळीच्या दिवशी पेनी मॉर्डेंटने शर्यतीतून माघार घेतल्याच्या घोषणेसह, सुनक यांची कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी बिनविरोध निवड झाली. 42 वर्षीय ऋषी सुनक कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 357 खासदारांपैकी अर्ध्याहून अधिक खासदारांचा पाठिंबा होता, तर विजयासाठी त्यांना किमान 100 खासदारांची गरज होती.






या निवडणुकीत ब्रिटनच्या माजी गृहमंत्री प्रिती पटेल, कॅबिनेट मंत्री जेम्स क्लेव्हर्ली आणि नदीम जाहवी यांच्यासह अनेक प्रमुख कंझर्वेटिव्ह खासदारांनी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा गट सोडत सुनक यांना पाठिंबा दिला आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Rishi Sunak : भगवदगीतेला स्मरुन शपथ घेणारा ब्रिटनच्या इतिहासातील पहिलाच खासदार ते आता पंतप्रधान! ऋषी सुनक यांचे भारतीय कनेक्शन