Rishi Sunak New UK PM : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. ऋषी सुनक यांना 185 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला तर त्यांचे प्रतीस्पर्धी पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
कोण आहेत ऋषी सुनक? (Rishi Sunak)
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे आहेत. फाळणीपूर्वी त्यांच कुटुंब सध्याच्या पाकिस्तानमधील गुजरानवाला या गावी राहत होतं. फाळणीदरम्यान झालेल्या दंगलीमध्ये सुनक कुटुंबीयांनी पाकिस्तान सोडून दिल्लीत आश्रय घेतला. त्यानंतर ते ब्रिटनला गेले. ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन( इंग्लंड ) येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांनी ब्रिटनमध्येच लग्न केले. ऋषी सुनक हे 42 वर्षांचे असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत लग्न केले आहे. ऋषी सुनक हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ब्रिटनचे ते सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत आणि त्यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सुनक यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण घेतलं आहे.
ब्रिटनमध्ये चांगली प्रतिमा
ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्यांचे कौतुकही होत आहे. याशिवाय सरकारमधील ऋषी सुनक एक महत्त्वाचा चेहरा होते. अनेक प्रसंगी, ऋषी यांनी बोरिसऐवजी टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. त्यामुळेच भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर ही शक्यता खरी ठरवत ते ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत.
महत्वाच्या बातम्या