Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई गँग महाराष्ट्रासह देशात चर्चेचा विषय बनली आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या, अभिनेता सलमान खान याला वारंवार देण्यात येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या यामुळे बिश्नोई गँग चर्चेत होती. आता सलमान खानचे जवळचे संबंध असणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. त्यामुळे दिग्गज सेलिब्रिटींना संपवणाऱ्या ही लॉरेन्स बिश्नोई टोळी किंवा गँग चावलतं तरी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. जाणून घेऊयात याबाततची सविस्तर माहिती....
सध्या लॉरेन्स बिश्नोई याची टोळी कोण चालवतं?
1. अनमोल बिश्नोई
2. गोल्डी ब्रार (सतींदरजीत सिंग)
3. रोहित (रावताराम स्वामी)
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अनमोल बिश्नोईचं नाव समोर आलं आहे. अनमोलने सिग्नल अॅपद्वारे त्या शूटर्सशी संपर्क साधला होता. अनमोल हा पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या खुनातील मुख्य आरोपी आहे आणि लॉरेन्स बिश्नोईनंतर त्याच्या टोळीची सगळी जबाबदारी अनमोलकडे आहे.
दुसरीकडे, गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा कमांडर आहे, जो अमेरिकेतून सगळी कामं पाहतो. त्याचं नाव सिद्धू मुसेवालाच्या खुनातही पुढे आलं होतं आणि सलमान खानच्या प्रकरणातही त्याचा संबंध असल्याचं सांगितलं जातं. गोल्डीच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर सरकारने बक्षिसं ठेवली आहेत. कॉलेजच्या दिवसांपासूनच गोल्डीवर लॉरेन्स बिश्नोईचा प्रभाव होता, आणि त्याचं नाव त्याच्या स्वतःच्या भावाच्या खुनातही आलं होतं.
अनमोल आणि गोल्डी सोबत, रोहित नावाचा तिसरा गँगस्टरही बिश्नोई टोळीचा भाग आहे. रोहित सध्या अमेरिकेतून टोळी चालवतो. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यावर, रोहितने सोशल मिडियावर पोस्ट करून त्याची जबाबदारी घेतली होती. रोहितचा मूळ नाव रावताराम स्वामी आहे, जो एकेकाळी मोबाईल टेक्निशियन होता, पण आता गुंडगिरीत आला आहे.
एनआयएच्या अहवालानुसार, बिश्नोई टोळी केवळ पंजाबपुरती मर्यादीत न राहता अनेक देशांमध्ये पसरली आहे. लॉरेन्स आणि गोल्डीने हरियाणा, दिल्ली, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये गुन्हेगारांचं मोठं जाळं तयार केलं आहे, आणि आता त्यांचं नेटवर्क भारतात 11 जिल्हे आणि परदेशात 6 देशांमध्ये पसरलं आहे, ज्यात अमेरिका, दुबई, रशिया आणि इतर देशांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या