Pune Connection of Bishnoi Gang, पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग (Bishnoi Gang) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येच्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात होता. यापूर्वी या टोळीने पुण्यातील काही गुन्हेगारांशी संबंध जोडले होते. या प्रकरणात पुण्यातील (Pune) दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती.


बिष्णोई टोळीचे 'पुणे कनेक्शन'


सिद्धू मुसेवाला हत्येच्या तपासादरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. जाधवला लपवून ठेवणारे नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांनाही अटक करण्यात आली. तिघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावातील रहिवासी आहे, तर कांबळे नारायणगावचा आणि सूर्यवंशी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहे. 2021 मध्ये, मंचर परिसरात पूर्वीच्या भांडणामुळे संतोष जाधवने ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. त्यानंतर तो पळून गेला आणि बिष्णोई टोळीशी त्याचा संपर्क झाला.


अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री (दि.12) मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सातत्याने चर्चेत असलेली बिश्नोई गँग महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. 


बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली 


बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टवरुन बाबा सिद्दिकीच्या यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान या पोस्टनंतर शुभम लोणकर फरार झाला आहे. शुभम लोणकर फरार झाला असला तरी पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकर याला अटक केली आहे. कथित पोस्ट करणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोटचा आहे. पोलीस प्रवीण लोणकरच्या घरी पोहोचले होत, मात्र त्याच्या घराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले होते. 


शुभम लोणकर याला यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अवैध शस्त्रांसह अटक केल होती. दरम्यान, शुभम लोणकरचे लॉरेन्स बिश्नोई कनेक्शनही समोर आले होते. दरम्यान, आता क्राईम ब्रँचनं पुण्यातून शुभम लोणकरच्या भावाला अटक केली आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगचे कनेक्शन महाराष्ट्रात पसरले  आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Baba Siddique : बाबा सिद्दीकी प्रकरणात तिसरी अटक, फेसबुक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर जाळ्यात 


Baba Siddique : बाबा सिद्दिकींना अखेरचा निरोप, भर पावसात दफनविधी, झिशान सिद्दीकींनी टाहो फोडला


Mumbai Police : बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती, पण 3 पोलीस तैनात होते, 1 जण घटनास्थळी होता, लॉरेंन्स बिश्नोई गँगबाबतही मुंबई पोलिसांचे मोठे खुलासे