Lata Mangeshkar on Farmers Protest : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत.  गायिका रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलीफासारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर, कंगना रनौत, अक्षय कुमार, अजय देवगण, एकता कपूर, विराट कोहली, सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेचं स्वागत करत ट्वीट केलं आहे. आता गाणकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.


लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारत महान देश आहे आणि आपण सगळे भारतीय यामुळं गौरवान्वित आहोत. त्यांनी म्हटलंय की, एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो अथवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. आपल्या लोकांचं हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीनं तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 'इंडिया टूगेदर' आणि 'इंडिया अगेनस्ट प्रोपगेंडा' असे हॅशटॅगही दिले आहेत.





Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट..


भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही - सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनीही याला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.


कोणताही प्रोपागंडा देशातील ऐक्याला बाधा पोहचवू शकत नाही, गृहमंत्री अमित शाह यांचा परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर पलटवार


भारताविरूद्ध प्रचाराचा भाग होऊ नका : अजय देवगन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली विरोध करणार्‍यांना इशारा देत आपण कोणत्याही प्रचाराचा भाग घेऊ नये, असा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, की "भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही प्रचाराचा भाग होऊ नका. कोणताही मतभेद न करता एकत्र उभे राहणे महत्वाचे आहे. "


Rihanna Farmer Protest Comment: परराष्ट्र मंत्रालयाकडून रिहाना, ग्रेटा यांना सल्ला, तर अक्षय कुमार म्हणतो..


अर्थवट सत्य धोकादायक : सुनील शेट्टी
अभिनेता सुनील शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की- "आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यापक नजरेने पाहिले पाहिजे. कारण, अर्धसत्य धोकादायक असते. तर करण जोहरने लिहिले आहे की आपण कठीण काळात जगत आहोत आणि प्रत्येक वळणावर धीर धरला पाहिजे ही काळाची गरज आहे. एकत्र येऊन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. शेतकरी हा भारताचा कणा असून यात कुणालाही फूट पाडू देऊ नका.


सामंजस्य ठरावाचे समर्थन करा -अक्षय कुमार


अभिनेता अक्षय कुमारने आज ट्विटरवर लिहलंय की, "शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा."