नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या वक्तव्याला कोट करत त्यांनी लिहलंय की कोणताही प्रोपागंडा देशातील ऐक्य बाधित करू शकत नाही. ते म्हणाले की कोणताही प्रोपागंडा देशाला उंचावर जाण्यापासून रोखू शकत नाही. भारताच्या प्रगतीसाठी सर्वजण एकजूट आहेत.


पॉप गायक रिहानानंतर ग्रेटा थुनबर्ग, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाचीसह आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अनेक लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलनाला संदर्भात परदेशात बसलेल्या काही शक्ती अजेंडा चालवत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या विषयांवर कोणतेही मत देण्यापूर्वी, संपूर्ण माहिती मिळवणे चांगले. अर्धवट माहितीवर सोशल मीडियावर व्यक्त केलेल मत हे बेजबाबदार असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.




शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहाना काय बोलली?
कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे."


मंगळवारी आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना यांनी ट्विटरवर शेतकरी आंदोलना संदर्भात एक बातमी शेअर करत "आपण याबद्दल का बोलत नाही?" असं लिहलंय. तर हवामान कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले की, "आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनासाठी एकजूट आहोत."


दरम्यान, बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी, करण जोहर आणि कंगना रनौत यांनीही परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.


काय आहे प्रकरण?
तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. येथे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने तटबंदी केली आहे. सरकारने येथे इंटरनेट सेवाही बंद केली आहे.