एक्स्प्लोर

गेल्या 24 तासात देशात 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 315 जणांचा मृत्यू 

गेल्या 24 तासात देशात 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर मागील 24 तासात 315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus Cases Today in India : देशात दिवसेंदिवस कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण देखील वाढत आहेत. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर मागील 24 तासात 315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये 6.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 14.78 टक्के आहे. 

दरम्यान, काल  देशात कोरोनाचे 2 लाख 47 हजार 417 नवीन रुग्ण आढळून आले होते. आज त्यामध्ये 16 हजार 785 रुग्णांची वाढ झाली आहे. म्हणजे दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 12 लाख 72 हजार 73 एवढी आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 85 हजार 350 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी  48 लाख 24 हजार 706 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. काल दिवसभरात 1 लाख 9 हजार 345 लोक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

155 कोटी लसींचे डोस

सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. ज्या लोकांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 155 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 73 लाख 8 हजार 669 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 155 कोटी 39 लाख 81 हजार 819 लसींचे डोस देण्यात आले आहेत.

ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील जवळपास 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

Embed widget