एक्स्प्लोर

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 67 हजार 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 1 हजार 192 जणांचा मृत्यू

सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 67 हजार 59 नवीन कोरोनाचे रुग्णांची नोंद झाली.

Corona New Cases Today : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्णसंख्येत घट जरी होत असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 67 हजार 59 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर  1 हजार 192 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर गेल्या 24 तासात 2 लाख 54 हजार 76 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण 4 कोटी 14 लाख 69 हजार 499 झाले आहेत. तर सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 17 लाख 43 हजार 59 झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत 3 कोटी 92 लाख 30 हजार 198 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4 लाख 96 हजार 242 लोकांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लसीकरणाचा विचार केला तर देशात आत्तापर्यंत 166 कोटीहून अधिक कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहिम सध्या देखील सुरू आहे. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 11.69 टक्के एवढा आहे.

India's daily cases drop below 2 lakh; the country reports 1,67,059 new #COVID19 cases, 1192 deaths and 2,54,076 recoveries in the last 24 hours

Active case: 17,43,059 (4.20%)
Daily positivity rate: 11.69%

Total Vaccination : 1,66,68,48,204 pic.twitter.com/7yjkgUUMB8

— ANI (@ANI) February 1, 2022

">

कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात 2 लाख 09 हजार 918 जणांना कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 959 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी म्हणजे मागील 24 तासाची आकडेवारी बघितली तर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 1 हजार 192 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 140  नव्या रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 423  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  काल राज्यात 91 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत 3221 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget