Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांना मोठा दिलासा मिळाला आहे, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मिश्रा यांचा अटकपूर्व जामीन वाढवला आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी 3 ऑक्टोबर 2021 रोजी अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा प्रकार घडला होता, ज्यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला असून आशिष मिश्रा यांना दिलेल्या अटकपूर्व जामिनाची मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवली आहे. 


 


सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा 


ऑक्टोबर 2021 मध्ये लखीमपूर खेरीतील तिकोनिया मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर आरोप निश्चित करण्यात आला. सर्वोच्च न्यायलयाने आशिष मिश्रा यांच्या अटकपूर्व जामिनाला पुढील सुनावणीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायालयाने रजिस्ट्रीला ट्रायल कोर्टाकडून अहवाल प्राप्त करण्याचे निर्देश दिले असून खटल्याला स्थगिती दिली आहे. आशिष मिश्रा यांच्यासोबत 14 जणांवर हा आरोप निश्चित करण्यात आला. या प्रकरणी आशिष मिश्रा यांच्यासोबत अंकित दास, नंदन सिंह बिष्ट, लतीफ काले, सत्यम उर्फ सत्य प्रकाश त्रिपाठी, शेखर भारती, सुमित जायसवाल, आशीष पांडे, लवकुश राणा, शिशुपाल, उल्लास कुमार उर्फ मोहित त्रिवेदी, रिंकू राणा, वीरेंद्र शुक्ला, धर्मेंद्र बंजारा यांच्यावर हा आरोप निश्चित करण्यात आला आहे. 


एसआयटीकडून 5000 पानी आरोपपत्र दाखल 


या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 147, 148, 149, 302, 307, 326, 427 आणि 120 (ख) तसेच मोटर वाहन अधिनियम कलम 177 अन्वये आरोप निश्चिती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा 'टेनी' यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर चार शेतकऱ्यांना जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार केल्याचा गंभीर आरोप आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा, त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने 5000 पानी आरोपपत्र दाखल केले असून ही घटना सुनियोजित कट असल्याचे एसआयटीने म्हटलं होतं.



गेल्या वर्षी मिळाला जामीन 


लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 26 सप्टेंबर रोजी दिल्लीतील रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहू नये आणि माध्यमांशी बोलू नये, असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आशिषला त्याच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या मुलीवर उपचार करण्यासाठी दिल्लीला जाण्याची परवानगी दिली होती.


 


हेही वाचा>>>


Ashok chavan BJP news :  काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात, आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य