Haldwani Violence : हल्द्वानीच्या बनभूलपुरा (Banbhalpura) येथील हिंसाचारानंतर (Uttarakhand Violence) इथल्या नागरिकांचा स्थलांतराचा वेग वाढला आहे. हल्दवानी पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने लोक बनभूलपुरा सोडत असल्याचं सांगितलं जातंय. आतापर्यंत सुमारे 300 कुटुंबे आपल्या घरांना कुलूप लावून यूपीमध्ये राहायली गेली असल्याचं समजतंय. परिसरातून लोकांचे स्थलांतर सुरूच आहे. इथल्या नागरिकांनी रविवारी सकाळी वाहने नसल्यामुळे लोकांनी पायीच लालकुवान गाठले. येथून ते रेल्वेने बरेलीला रवाना झाले.
पोलिसांच्या कारवाईची भीती, अनेक जण चौकशीसाठी ताब्यात
शनिवारी पोलिसांनी बनभूलपुरा भागातून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या काळात पोलिसांनी सौम्य बळाचाही वापर केल्याचा आरोप आहे. कर्फ्यू अनेक दिवस टिकेल या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने लोकांनी स्थलांतराला गती दिली आहे. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून अनेक कुटुंबे सामान घेऊन बरेली रोडवरून चालताना दिसले. वाहनांच्या कमतरतेमुळे लोक 15 किलोमीटर पायी चालत लालकुआनला पोहोचले. तेथून त्यांनी बरेलीला ट्रेन पकडली आणि यूपीच्या वेगवेगळ्या शहरांकडे रवाना झाले.
पोलीस निरपराध लोकांना त्रास देत असल्याचा नागरिकांचा आरोप
उत्तराखंड येथील बनभूलपुरातील हिंसाचारानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त वाढला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना इथल्या लोकांनी सांगितले की, पोलिस निरपराध लोकांना त्रास देत आहेत. पोलिसांच्या भीतीने तो बाहेरी येथील नातेवाइकाकडे जात आहे. वाहनाअभावी पायी जात असल्याचे सांगितले. दरम्यान, सलमान अन्सारीने सांगितले की, तो आपल्या तीन मुलांसह बरेलीला जात आहे. आपण तिथे नातेवाईकाच्या घरी राहू असे सांगितले. दुसरीकडे बनभूलपुरा परिसरातील सुमारे 300 घरांना कुलूप लागले आहे. हे सर्वजण घरातून निघून गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.
"दोन पैसे कमी कमावणार पण शांततेत जगेन"
रामपूरचा रहिवासी असलेल्या यासीनने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, आपल्या कुटुंबासह हल्द्वानीला तो कामाच्या शोधात आला होता. तेव्हा त्याने बनभूलपुरा या ठिकाणी दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. येथे तो हायटेक किचन बनवण्याचे काम करतो. मात्र आता तो हल्द्वानीला पुन्हा कामाला येणार नाही, असे सांगितले. म्हणाला- दोन पैसे कमी कमावणार पण शांततेत जगेन. असे तो म्हणाला
25 जणांना अटक, गुन्हा दाखल
हल्दवानी हिंसाचारानंतर पोलिसांनी अटक केलेल्या 25 आरोपींविरुद्ध दंगल, दरोडा, सरकारी मालमत्तेचे नुकसान, खून अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एसएसपी प्रल्हाद नारायण मीणा यांनी सांगितले की, या आरोपींवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी नामांकित आणि अनोळखी 5 हजारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर पुराव्याच्या मदतीने एक नाव आणि 11 अनोळखी लोकांना अटक केल्याचे सांगितले. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सातत्याने छापे टाकले जात आहेत. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल.
90 हून अधिक संशयितांना तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले
हल्दवानी हिंसाचारात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या 90 हून अधिक संशयितांना पोलिसांनी गौलापार येथे बांधलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ठेवले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडीओच्या आधारे या सर्व लोकांचे चेहरे जुळवत आहेत. यासोबतच इतर पुरावेही गोळा करण्यात येत आहेत.
नेमका प्रकार काय?
उत्तरखंडातील हल्दवानी येथील बनभुलपुरा येथे बांधलेली बेकायदेशीर मशीद तसेच मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलिसांवर तसेच प्रसारमाध्यमांवर गुरुवारी सायंकाळी मुस्लिम समाजाच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चार हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात पोलीस सतर्क झाले आहेत.