Lakhimpur Kheri Case : लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याची पुन्हा तरुंगात रवानगी होऊ शकते. आशिष मिश्रा याचे जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवकुमार त्रिपाठी आणि सीएस पांडा या वकिलांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी ही याचिका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, याप्रकरणी अजूनही अजय मिश्रा याची चौकशी झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचे काम असमाधानकारक आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा 'टेनी' यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर 4 शेतकऱ्यांना थार जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने 5000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ही घटना सुनियोजित कट असल्याचे एसआयटीने म्हटले.
लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Saint Ravidas Jayanti : संत रविदास जयंती; राजकीय नेते करणार शक्तीप्रदर्शन, पाहा कोणाची कुठे होणार सभा?
- Manmohan Singh Video: विदेशी नेत्यांना मिठी मारुन, बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंहांचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
- Ashwani Kumar : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका, माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचा राजीनामा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha