एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आधी वडिलांना संपवलं, दहा दिवसांनी आईची हत्या, क्रूरकर्मा तरुणीसह बॉयफ्रेण्डला बेड्या

54 वर्षीय गुरमीत सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्यामुळे त्यांची 43 वर्षीय पत्नी जगीर कौर काळजीत पडली होती. मात्र बाबांचा फोन तुटला आहे. त्यांनी नवा फोन घेतलेला नाही. ते कामात व्यस्त आहेत, असं कारण त्यांची 26 वर्षांची मुलगी दविंदर कौर देत असे

नवी दिल्ली : बॉयफ्रेण्डच्या मदतीने आई-वडिलांची हत्या करणाऱ्या दिल्लीतील तरुणीला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणीने वडिलांची हत्या केल्यानंतर दहा दिवस आईपासून त्यांचा मृत्यू लपवून ठेवला होता. त्यानंतर त्याच पद्धतीने तिने सख्ख्या आईचाही जीव घेतला. 54 वर्षीय गुरमीत सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्यामुळे त्यांची 43 वर्षीय पत्नी जगीर कौर काळजीत पडली होती. मात्र बाबांचा फोन तुटला आहे. त्यांनी नवा फोन घेतलेला नाही. ते कामात व्यस्त आहेत, असं कारण त्यांची 26 वर्षांची मुलगी दविंदर कौर देत असे. दविंदर आणि तिचा बॉयफ्रेण्ड प्रिन्स दीक्षितने गुरमीत सिंग यांना गुंगीचं औषध देऊन नाक दाबून त्यांची हत्या केली होती. त्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन एका गटारात फेकून देण्यात आला. वडिलांच्या मृत्यूनंतर लेकीने 21 फेब्रुवारी ते 2 मार्च असे तब्बल दहा दिवस हा लपंडाव सुरु ठेवला. दोन मार्चला जगीर कौर यांनाही दविंदर आणि प्रिन्स दीक्षितने त्याच पद्धतीने मारलं. आठ दिवसांनी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीच्या पश्चिम विहार भागातील 50 लाख रुपये किमतीचं घर विकण्यासाठी दोघांनी आई-वडिलांना जीवे मारल्याचा आरोप आहे. दविंदरचा घटस्फोट झाला असून तिला तीन आणि पाच वर्षांची मुलं आहेत. नवऱ्याला सोडून माहेरी आलेली दविंदर वर्षभरापूर्वी आई-वडिलांच्या घरातूनही बाहेर पडली होती. नोकरी शोधताना तिची ओळख प्रिन्सशी झाली. दविंदर आणि प्रिन्स यांचं नातं गुरमीत-जगीर यांना मान्य नव्हतं. ते कायम लेकीला त्यावरुन सुनवत असत. सहा महिन्यांपूर्वी दोघांनी संपत्ती गिळंकृत करण्यासाठी गुरमित-जगिर यांच्या हत्येचा कट शिजवला. विशेष म्हणजे गुरमीत आणि जगीर यांना आणखी तीन मुलं आहेत. मात्र आपल्या आई-वडिलांच्या जीवाचं बरं वाईट झाल्याची कुणकुणही त्यांना लागली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget