एक्स्प्लोर

कुमार विश्वास 'आम आदमी पक्षा'ची साथ सोडण्याच्या तयारीत?

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाची नौका राजकारणाच्या समुद्रात भरकटताना दिसत आहे. आपच्या आंदोलनांशी संलग्न राहिलेला एक-एक शिलेदार आता पक्षाची साथ सोडताना दिसत आहे. आपचे दिग्गज नेते कुमार विश्वासही पक्षाला राम राम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विश्वास यांची मनधरणी करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनिष सिसोदियासोबत कुमार विश्वास यांच्या निवासस्थानी गेले होते. विश्वास यांनी गाडीत बसवून नेताना 'चहा पाजायला नेत आहे' असं उत्तर केजरीवालांनी पत्रकारांना दिलं. आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाला वैतागलेल्या कुमार विश्वास यांनी नुकतंच मनातील रागाला मीडियासमोर वाट मोकळी करुन दिली होती. 'हा माझा नाही, देशाचा आवाज आहे. देशाचा आवाज समोर आणल्याबद्दल कुठलंही सरकार, व्यवस्था किंवा संघटना माझ्यावर नाराज झाली, तरी माफी मागणार नाही. मी बोलत राहणार' अशा भावना विश्वास यांनी व्यक्त केल्या होत्या. रात्रभर विचार करुन निर्णय जाहीर करणार, असं कुमार विश्वास मंगळवारी म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कुमार काय घोषणा करणार, याकडे तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. 'सहा-सात वर्षांपूर्वी याच घरात मी, अरविंद आणि मनिष यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं स्वप्न पाहिलं होतं. दोन वर्षांपूर्वी लोक जनशक्ती पक्षातून आलेल्या अमानतुल्लाहने मी भाजपचा एजंट असल्याचा आरोप केला. पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही. आता अमानतने याचा पुनरुच्चार केला, तेव्हा मला लक्षात आलं, की यामागे दुसऱ्याच कोणाचा तरी हात आहे.' अशा उद्विग्न भावना कुमार विश्वास यांनी व्यक्त केल्या. 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, ना उपमुख्यमंत्री व्हायचंय, मला पक्षाचं अध्यक्षपदही नको. मला कोणता राजकीय पक्षप्रवेशही करायचा नाही किंवा स्वराज्य आंदोलनात सहभागीही व्हायचं नाही. पण मी माझं मत मांडणार' असा पवित्रा विश्वास यांनी घेतला. ये बला की साजिशें, ये पैंतरे मेरे खिलाफ... रायगा हैं मैं तुम्हारे खेल का हिस्सा नहीं असा शेर बोलताना विश्वास भावुक झाले. काय आहे प्रकरण? कुमार विश्वास आणि त्यांच्या समर्थकांनी आमदार अमानतुल्ला यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी उचलून धरली आहे. मात्र कुमार विश्वास यांच्यावरच माफी मागण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भ्रष्टाचाराविरोधात निर्माण झालेला पक्ष, भ्रष्टाचाराविरोधातच कोणती कारवाई करत नाही, असं वक्तव्य कुमार विश्वास यांनी केलं. या व्हिडिओवरुन प्रकरणाला तोंड फुटलं. आमदार अमानतुल्ला खान यांनी कुमार विश्वास संघ-भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. 'आप'ने अमानतुल्ला यांना राजकीय कामकाज समितीवरुन हटवलं, मात्र विश्वास यांचं समाधान झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार

Embed widget