Kolkata Durga Puja Pandal Idol Controversy : कोलकाता (Kolkata) येथील दूर्गा पूजा (Durga Puja) मंडपामध्ये असलेल्या मूर्तीवरून मोठा वाद सुरू झाला आहे. दुर्गा देवीची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. ज्यामध्ये खाली बसलेली महिषासुराची मूर्ती महात्मा गांधींसारखी दिसल्याने लोकं संतप्त झाले आहेत. देशात रविवारी महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत असतानाच या वादाला सुरुवात झाली.


पोलिसांनी दिलेल्या सुचनेनंतर 'तो' पुतळा बदलण्यात आला
दक्षिण पश्चिम कोलकाता येथील रुबी क्रॉसिंगजवळ हा दुर्गा पूजा मंडप बांधण्यात आला आहे. माहितीनुसार याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर गांधींसारखा दिसणारा पुतळा बदलण्यात आला. या संपूर्ण प्रकाराबाबत आयोजकांनी सांगितले की, ही समानता निव्वळ योगायोग आहे. पौराणिक कथेनुसार, दुर्गा देवीने महिषासुराचा वध दुष्टशक्तीचा अंत करण्यासाठी केला. यावर अखिल भारतीय हिंदू महासभेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले, "येथे सुरुवातीला पुजल्या जाणार्‍या दुर्गा मूर्तीमध्ये जो महिषासुर राक्षस होता, ज्याचा चेहरा महात्मा गांधींसारखा होता. या मूर्तीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने भेट दिली. त्यानंतर आता या मूर्तीतील महिषासुराचा चेहरा बदलण्यात आला.


उत्सवादरम्यान तणाव निर्माण होऊ शकतो - कोलकाता पोलीस
यापूर्वी एका पत्रकाराने कोलकाता पोलिसांना टॅग करत दुर्गा मूर्तीचा फोटो ट्विट केला होता. नंतर त्यांनी पोस्ट हटवा असे सांगत पोलिसांनी ते चित्र काढून टाकण्यास सांगितले होते, याचे कारण उत्सवादरम्यान तणाव निर्माण होऊ शकतो. पत्रकाराने एका नवीन ट्विटमध्ये लिहिले - मला कोलकाता पोलिस सायबर सेल @DCCyberKP ने कोलकाता येथील एका विशेष पूजेवर माझे ट्विट हटवण्याची विनंती केली आहे, कारण त्यांना वाटते की यामुळे उत्सवादरम्यान तणाव निर्माण होऊ शकतो. एक जबाबदार नागरिक म्हणून मी त्यांच्या विनंतीचे पालन करतो.


निषेधाची ही पद्धत नाही.
हिंदू महासभेचे चंद्रचूड गोस्वामी गोस्वामी म्हणाले, "संघटनेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. पोलिसांनी आम्हाला ते बदलण्यास सांगितले आणि आम्ही ते बदलले. बांगिया परिषद हिंदू महासभेचे अध्यक्ष संदीप मुखर्जी म्हणाले, "अखिल भारतीय हिंदू महासभेने जे काही केले आहे त्याचे आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. आमचे गांधीजींच्या विचारांशी मतभेद होते, पण निषेधाची ही पद्धत नाही."


इतर महत्वाच्या बातम्या


Dasara Melava : दसरा मेळाव्यानिमित्त एसटी महामंडळासोबत खाजगी बस मालकांना होणार मोठा आर्थिक फायदा, कोणत्या गटाच्या किती बस बुक?


कधी अग्निस्नान, कधी जलसमाधी; 72 तासांच्या समाधीनंतरही पुरुषोत्तमानंद सुखरुप, भाविकांची गर्दी