St xavier's university kolkata : कोलकाता येथील सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटीमध्ये (St xavier's university) बिकिनी परिधान केलेल्या महिला प्राध्यापिकेच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे पोस्ट केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी महिल प्राध्यापिकेवर केला होता. आता त्या महिला प्राध्यापिकेविरोधात विद्यापीठ प्रशासनाने तब्बल 99 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा तापले आहे. 


वास्तविक, ही घटना कोलकाता येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातील आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, महिला प्रोफेसरने कॉलेज प्रशासनावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. मुलांच्या पालकांकडून झालेल्या तक्रारीनंतर त्यांना कॉलेज सोडण्यास भाग पाडण्यात आले, असा दावा केला आहे. मात्र, बिकिनी परिधान केलेल्या महिलेची ही पोस्ट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील आहे.


महिला प्राध्यापिका न्यायालयात धाव घेणार 


या मानहानी नोटिशीच्या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे या महिला प्राध्यापकाच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. त्याच वेळी, या प्रकरणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी महिला प्रोफेसरची बाजू समजावून घेण्यासाठी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बिकीनी परिधान केलेला फोटो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण तोपर्यंत ते फोटो ट्रॅश सेक्शनमध्ये जातील. विद्यापीठात रुजू होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी महिला प्राध्यापिकेने इंस्टाग्रामवर ते फोटो पोस्ट केले होते. 


विद्यार्थ्यांच्या वडिलांकडून तक्रार 


मीडिया रिपोर्टनुसार, महिला प्रोफेसरने सांगितले होते की, प्रथम वर्षाच्या मेल अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या वडिलांनी तक्रार पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी आपल्या मुलाला विद्यापीठातील महिला प्राध्यापकाचे अश्लील फोटो पाहताना पकडले. या पत्राच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने आपल्यावर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाला वेग आला आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीसाठी 99 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या