Corona Cases Update In India : देशात कोरोना व्हायरसचा (Covid-19) प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 47 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. सध्या 1,28,261 सक्रिय रुग्ण देशात आहेत. तर, नव्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासांत 19,539 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 






देशात काल, म्हणजेच, 9 ऑगस्ट रोजी 12,751 नव्या रुग्णांची नोंद झाली होती, 8 ऑगस्ट रोजी 16167 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 7 ऑगस्ट रोजी 18,738 नव्या रुग्णांची नोंद, 6 ऑगस्ट रोजी 19,406 नवीन प्रकरणे, 4 ऑगस्ट रोजी 19,893 नवीन प्रकरणे आणि 3 ऑगस्ट रोजी 17,135 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.


राज्यात काल (मंगळवारी) 1,782 नव्या रुग्णांचं निदान


राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर काल सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात राज्यात एकूण 1854 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची  राज्यात काल एकूण 11,889 इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमध्ये 3127 इतके सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल पुण्यामध्ये 2672 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1120 रुग्ण आहेत. 


मुंबईत मंगळवारी 479 रुग्णांची नोंद, 329 कोरोनामुक्त


मुंबईत मंगळवारी दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. काल मुंबईत 479 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,05,646 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 660 झाली आहे. सध्या मुंबईत 3,127 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 479 रुग्णांमध्ये 449 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1857 दिवसांवर गेला आहे.