Kerala News : साक्षरतेच्या दृष्टीने अग्रेसर असणाऱ्या केरळमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. केरळमधील मलप्पुरममध्ये आई आणि मुलगा चक्क एकाच वेळी सरकारी नोकरीत रूजू होणार आहेत. या मायलेकरांनी एकाच वेळी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. आणि ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करण्यासाठी या मायलेकरांना यश आलं आहे.
आईने एलजीएस (LGS) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तर दुसरीकडे मुलगा एलडीसी (LDC) उत्तीर्ण झाला आहे. 42 वर्षीय बिंदू सांगतात की, त्यांचा मुलगा विवेक दहावीत असताना त्यांनी त्याला शिकवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तके वाचायला सुरुवात केली होती. याच काळात त्यांना केरळ लोकसेवा आयोगाच्या (पीएससी) परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. खरंतर बिंदू या व्यवसायाने गेल्या दहा वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत.
मुलाखती दरम्यान बिंदू म्हणाल्या...
एका टीव्ही चॅनलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान बिंदू म्हणाल्या की त्यांनी 'लास्ट ग्रेड सर्व्हंट' (एलजीएस) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ज्यामध्ये त्यांचा 92 वा क्रमांक आला आहे. तर त्यांच्या मुलाने लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) परीक्षेत 38 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आपल्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली, त्यानंतर त्यांनी कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी ग्रॅज्युएशननंतर मुलगा विवेक यालाही तिथे प्रवेश मिळवून दिला.
बिंदू गेल्या 10 वर्षांपासून त्या अंगणवाडी शिक्षिका आहेत. बिंदूने सांगितले की पीसीएस परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या त्यांच्या वारंवार प्रयत्नांमध्ये, त्यांचे शिक्षक आणि त्यांच्या मुलाने त्यांना प्रोत्साहन दिले आणि पाठिंबा दिला. बिंदूचा मुलगा विवेक याने टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत नव्हतो, पण काही विषयांवर एकत्र चर्चा मात्र नक्की करायचो.
महत्वाच्या बातम्या :