Corbevax Vaccine : ज्या नागरिकांनी Covaxin किंवा Covishield लशीचे दोन डोस घेतले आहेत. आता ते नागरिक Corbevax या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. NTAGI बायोलॉजिकल ईद्वारे विकसित कॉर्बेव्हॅक्स लसीला केंद्र सरकानं परवानगी दिली आहे.
भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "18 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, ज्यांनी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत. ते आता Corbevax लसीचा बूस्ट डोस घेऊ शकतात. केंद्र सरकारनं ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉटला मान्यता दिली आहे.
सध्या लहान मुलांना दिली जातेय Corbevax
भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब्यूनिट लस Corbevax, सध्या COVID-19 लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जात आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 4 जून रोजी 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून Corbevax ला मंजूरी दिली.
10 जानेवारीपासून दिला जातोय बूस्टर डोस
सध्या, पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वापरण्यात आलेली कोविड-19 लस 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांना खबरदारी म्हणून दिली जात आहे. 18-59 वयोगटातील 4.13 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत, तर 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांना, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना 5.11 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतानं 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना लसींचा बूस्टर डोस (Booster Dose) देणं सुरू केलं आहे.