India at 2047 : भारत आपल्या राष्ट्रीय हितांची पुरेशी काळजी घेण्यास समर्थ आहे. तसेच जगभरात शांतता, समृद्धी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावण्याची भारतामध्ये क्षमता आहे. BRICS आणि SCO (Shanghai Cooperation Organisation) ते  QUAD (Quadrilateral Security Dialogue) या परस्परविरोधी उद्दिष्टांसह तयार झालेल्या सर्व बहु-राष्ट्रीय गटांमध्ये भारताचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. नवीन जागतिक व्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. 


BRICS ची स्थापना रशिया, चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेने या देशांनी केली आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि ब्रिक या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स करण्यात आले आहे. 2009 मध्ये ब्रिक राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एकतीनबर्ग येथे संपन्न झाली होती. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राजकीय, आर्थिक आणि वित्तीय सुधारणा घडवून आणणे व संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोठ्या सत्तांकडे झुकलेला तोल सुधारणे हे ध्येय ब्रिक्सने स्वत:पुढे ठेवले आहे. एका दशकाहून अधिक काळानंतर, भारताने आपलं स्थान भक्कम केलं आहे. विविध क्षेत्रांमध्ये चीनची आक्रमकता वाढत आहे. त्यामुळं राष्ट्रीय हितासाठी त्यांना रणनीती बदलण्याची मागणी देखील होत आहे.  


भारताची आर्थिक क्षमता वाढत आहे


शीतयुद्धाच्या समाप्तीमनंतर भारताला 10 सदस्यीय आसियान ते 28 सदस्यीय युरोपियन युनियन, मध्य आशिया ते आखाती ते आफ्रिकेपर्यंत आणि अगदी लॅटिन अमेरिकन आर्थिक गट मर्कोसूर या देशांच्या प्रतिस्पर्धी गटांसोबत विविधतेने जोडले गेले आहे. या सर्वच देशांशी भारताचे संबंध चांगले आहेत. भारताची आर्थिक क्षमता वाढत आहे. पाश्चात्य तंत्रज्ञान, उपकरणे आणि उत्पादनांसाठी एक मोठी उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून भारत पुढे येत आहे. आज जगातील सहावी सर्वात मोठी  अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघितलं जात आहे. युनायटेड स्टेट्ने भारतासोबत धोरणात्मक संबंध प्रस्थापीत करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. नौसेना कवायत मलबार मालिकेला 1992 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्या व्दिपक्षीय कवायतींनी प्रारंभ झाला होता. त्यांनतर 2015 पासून जपानच्या नौसेनेचे दल यामध्ये सहभागी झाले. त्यानंतर 2020 पासून ऑस्ट्रेलियाचे नौसेना दलही यामध्ये सहभागी झाले. म्हणजे QUAD ज्यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश आहे. यामध्ये चीनची आक्रमकता आणि विस्तारवादी धोरणे रोखणे आणि अपेक्षित वाढ रोखणे हा उद्देश आहे. 2049 पर्यंत यूएसएची जागा घेणारा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून चीन समोर येऊ शकते. 


द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीपासून ते SCO, BRICS, QUAD आणि आता I2U2 सारख्या बहुपक्षीय गटांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. तसेच मुत्सद्देगिरीने आपली राष्ट्रीय आर्थिक आणि धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चतुराईने आपली भूमिका मांडली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलत आहेत. या स्थितीत भारत एकीकडे रशिया-चीनचा तर दुसरीकडे अमेरिका-जपान-युरोप-ऑस्ट्रेलिया अशा प्रतिस्पर्धी गटांचा एक मित्र म्हणून उदयास आला आहे.


अमेरिका, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर भारताचे धोरणात्मक संबंध कायम


21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात, भारताचे जागतिक स्तरावर रशिया आणि चीन यांच्याशी थोडे मतभेद झाले. तसेच भारताने युनायटेड स्टेट्सबरोबरचे धोरणात्मक संबंध अधिक दृढ केले. परिणामी, 2008 मध्ये भारत-अमेरिका अणुकरारावर स्वाक्षरी करुन अमेरिकेने भारताचे आण्विक अलगाव संपवण्यास मदत केली.  ही भारतासाठी एक मोठी धोरणात्मक उपलब्धी मानली जाते. 
यूएस आणि पाश्चिमात्य देशांच्या नेतृत्वाखालील वित्तीय संस्थांच्या आर्थिक वर्चस्वाला आव्हान देण्याचा ब्रिक्सचा हेतू असताना, भारत याचा प्रमुख सदस्य असूनही, अमेरिका, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या आर्थिक शक्तींसोबत आपला धोरणात्मक सहभाग कायम ठेवत राहिला.


अमेरिका, युरोप, इस्रायल या देशांबरोबर भारताची संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी घट्ट


दक्षिण चीन समुद्र आणि चीन-भारत सीमांवरील चीनच्या आक्रमक वर्तनाने भारताला ब्रिक्सच्या जवळ जाण्यापासून सावध केले. भारत-चीन शत्रुत्वामुळे या महत्त्वाकांक्षी गटात तेढ निर्माण झाली आहे. भारताने 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून BRICS मध्ये सक्रिय सहभाग घेतला असला तरी, त्याच वेळी युनायटेड स्टेट्स, इस्रायल, युरोप, ASEAN या देशांसोबत संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी अधिक घट्ट केली. भारताने केवळ युनायटेड स्टेट्ससोबतच नव्हे तर फ्रान्स आणि यूके यांसारख्या युरोपातील मित्र देश आणि जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या पूर्व आशियाई आर्थिक शक्तींसोबतही धोरणात्मक भागीदारी करार केले आहेत..


रशियासोबत चांगले संबंध


फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेन या सार्वभौम राष्ट्रावर आक्रमण केले, तेव्हा भारताची सर्वात मोठी परीक्षा आली. ज्या दरम्यान अमेरिका आणि QUAD सारख्या गटातील त्याच्या सहयोगींनी भारताने रशियाचा निषेध करावा अशी अपेक्षा केली होती. यावेळी भारताने स्पष्टपणे युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले. परंतू रशियाशी  असलेले आपले संबंधही भारताने कायम ठेवले आहेत. कारण भारताच्या कठीण काळात रशिया पाठीशी उभा होता. भारत हा चीन, पाकिस्तान, यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी रशिया भारताला मदत करते. त्यामुळं रशियासाबोत भारताचे संबंध चांगले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: