एक्स्प्लोर
नराधम मामा... बहिणीच्या तीन वर्षीय मुलीची अत्याचार करुन हत्या
धक्कादायक म्हणजे या नराधमाने देखील शोधाशोध करण्याचे नाटक केले. पण गावातील काही लोकांनी बालिकेला उदाप्पाने नेल्याचे सांगितले. पण त्याला विचारल्यावर त्याने कानावर हात ठेवले.
![नराधम मामा... बहिणीच्या तीन वर्षीय मुलीची अत्याचार करुन हत्या Killed Girl After Sexual Harassment Latest Updates नराधम मामा... बहिणीच्या तीन वर्षीय मुलीची अत्याचार करुन हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/11/01000859/crime-scene.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी गावच्या शिवारात ही घटना घडली आहे. बलिकेवर अत्याचार करून तिचा गळा घोटणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
बलिकेवरील अत्याचाराची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. उदाप्पा (29) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून बहिणीच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून गावाबाहेरील उसाच्या शेतात नेले. उसाच्या शेतात त्याने बालिकेवर अत्याचार करताना तिने ओरडण्यास सुरुवात केली. तिचा आवाज बंद करण्यासाठी त्या नराधमाने तिच्या तोंडात माती कोंबली. नंतर तिला मातीत अर्धवट पुरले. हे दुष्कृत्य करून तो घरी आला तेव्हा मुलगी बेपत्ता झाले म्हणून शोधाशोध सुरू होती.
धक्कादायक म्हणजे या नराधमाने देखील शोधाशोध करण्याचे नाटक केले. पण गावातील काही लोकांनी बालिकेला उदाप्पाने नेल्याचे सांगितले. पण त्याला विचारल्यावर त्याने कानावर हात ठेवले.
अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्याने आपल्या राक्षसी कृत्याची कबुली दिली. सदर घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थ पोलीस स्थानाकासमोर जमा झाले आणि त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.त्यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)