एक्स्प्लोर

'किल नरेंद्र मोदी'... एनआयएकडे पंतप्रधानांना जीव मारण्याच्या धमकीचा ई-मेल

राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल मिळाला असून ज्यात देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 'किल नरेंद्र मोदी' असं या ई-मेलमध्ये लिहिलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल मिळाला असून ज्यात देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ई-मेलचा तपास सुरु आहे.

या ई-मेलमध्ये केवळ तीन शब्दच लिहिले आहेत. 'किल नरेंद्र मोदी' (Kill Narendra Modi) असा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. याबाबत एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सतर्क केलं आहे. गृहमंत्रालयाने याबाबत एसपीजीलाही माहिती दिली. एसपीजीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, "एनआयएला एक ई-मेल आयडी सापडला, ज्यात काही मान्यवरांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला. ई-मेलमधील मजकुरातून असेच संकेत मिळत आहेत." एनआयएने आपल्या पत्रासोबत ई-मेलची कॉपीही जोडली आहे. तसंच गृहमंत्रालयाने यावर योग्य कारवाई करण्यास सांगितलं आहे.

वृत्तानुसार हा ई-मेल ylawani12345@gmail.com नावाच्या अकाऊंटवरुन info.mum.nia@gov.in वर पाठवला आहे. हा ई-मेल मध्यरात्री 1 वाजून 34 मिनिटांनी पाठवला आहे. मेलमध्ये नरेंद्र मोदी यांना मारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हा ई-मेल समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा एनआयएच्या संपर्कात आहे. सध्या या ई-मेलमधील मजकुराचा तपास सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींवर एक तासात गोळ्या झाडण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी ममूरा गावात राहणाऱ्या 33 वर्षीय हरभजन सिंह नावाच्या तरुणाला अटक केली होती. अटकेच्या वेळी आरोपी नशेत होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
Embed widget