एक्स्प्लोर

Khorasan Province Planning: दहशतवादी संघटना ISKP भारतात हल्ल्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणणारे ISKP आता ISI च्या सांगण्यावरुन आणखी एका षडयंत्राची तयारी करत आहे. या तयारीसाठी त्यांनी भारतात असलेल्या आपल्या दहशतवाद्यांशीही संपर्क साधला आहे.

Khorasan Province Planning: अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ले करणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविन्स (ISKP) पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या सांगण्यावरून भारतात हल्ला करू शकते. यासाठी त्यांनी आपल्या कर्नाटक आणि काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांशी संपर्कही साधला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध कुरापतींसाठी आता पाकिस्तान अफगाणिस्तानचा वापर करणार हे हळूहळू समोर येऊ लागलंय.

भारतीय गुप्तचर संस्थांनी या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. अलीकडेच पकडलेल्या कथित दहशतवाद्यांनीही चौकशी दरम्यान हे उघड केले आहे की ते पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या म्होरक्यांच्या संपर्कात होते.

 इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविन्सचा कट

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणणारे ISKP आता ISI च्या सांगण्यावरुन आणखी एका रक्तरंजित षडयंत्राची तयारी करत आहे. या तयारीसाठी त्यांनी भारतात असलेल्या आपल्या दहशतवाद्यांशीही संपर्क साधला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्टनुसार, या संभाषणादरम्यान, आयएसच्या बॉसने त्यांच्या भारतातील दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी स्फोटके आणि शस्त्रे खरेदी करावीत. यासाठी लागणारा संपूर्ण आर्थिक रसद पुरवली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या षडयंत्राची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक आणि काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्यांची गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी कबूल केले की ते अनेकदा स्फोटांच्या कटाचा भाग होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना आश्वासन दिले होते की या कामासाठी सर्व शक्य मदत केली जाईल.

उजव्या विचारसरणीचे नेते, मंदिरे, पाश्चिमात्य देश दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

गुप्तचर अहवालांनुसार, ISKP च्या या दहशतवाद्यांचे लक्ष्य उजव्या विचारांचे नेते, मंदिरे, पाश्चिमात्य देश आणि गर्दीच्या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच ते परदेशी लोकांनाही लक्ष्य करू शकतात. भारतीय गुप्तचर संस्थांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना या कटाबाबत अलर्ट जारी केला आहे. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांच्या संभाषणात जे आळळलं आहे, त्यानुसार ते भारतात अनेक ठिकाणी स्फोट आणि आत्मघाती हल्ले करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. 

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ने यापूर्वी जम्मू -काश्मीर आणि कर्नाटकातून इसिसच्या लोकांना अटक केली होती. तेव्हा आयएसच्या व्हॉईस ऑफ हिंद नेटवर्कचाही भंडाफोड करण्यात आला होता. सध्या, भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा संस्था या षडयंत्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत की हे लोक कोण आहेत जे ISKP च्या या कटात सामील आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Embed widget