Corona Cases in India : भारतात कोरोना महामारीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,313 नवीन रुग्ण आढळले आहेत, 10,972 लोक या आजारातून बरे झाले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजारांहून अधिक (83,990 रूग्ण) वाढली आहे. यापूर्वी 22 जून रोजी देशभरात कोरोना संसर्गाची 12249 नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्री घेणार बैठक


दुसरीकडे, कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने झालेली वाढ पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना लगाम घालण्यावर चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वैद्यकीय तज्ज्ञही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


 






 


गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय.


गेल्या काही दिवसातील कोरोना रुग्णांचा अहवाल पाहिला तर संसर्गाचा वेग वाढला आहे. अनेक तज्ज्ञ याला चौथी लाट देखील म्हणत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात मंगळवारी बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून एकूण 12,249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी 13 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, या महामारीमुळे देशभरात मृतांची संख्या 5,24,941 वर पोहोचली आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, बुधवारी 3260 नव्या रुग्णांची नोंद


Covid19 Updates : काळजी घ्या... धोका वाढतोय! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजारांपार