Khalistan Rally failed : खलिस्तानी समर्थकांच्या मृत्यूनंतर ब्रिटनपासून अमेरिकेपर्यंत खळबळ उडाली आहे. नुकतंच ब्रिटन आणि अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांचं आंदोलन अयशस्वी झालं आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर मोजकेच खलिस्तान समर्थक जमले होते. मात्र, पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अपेक्षेपेक्षा लवकर आंदोलन मागे घेण्यात आले. त्याचवेळी अमेरिकेतील भारतीय दूतावासाबाहेरही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनापूर्वी सोशल मीडियावर अनेक पोस्टर्सही शेअर करण्यात आले होते. परदेशात बसून खलिस्तान समर्थक आपला प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र सुरक्षा यंत्रणांसमोर त्यांना यश मिळत नाहीये असेच चित्र दिसून आले. 


आंदोलन अयशस्वी 


8 जुलै रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर 30 ते 40 खलिस्तान समर्थक आंदोलनासाठी एकत्र आले. त्यांनी भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि बर्मिंगहॅममधील वाणिज्य दूतावासाचे प्रमुख शशांक विक्रम यांची छायाचित्रे असलेले वादग्रस्त पोस्टर्स लावले होते. पण, ज्या उद्देशाने हे लोक जमले होते तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही. यामध्ये ब्रिटिश पोलिसांच्या उपस्थितीने या लोकांची कामगिरी अयशस्वी झाली. आंदोलनात सहभागी झालेले हे लोक अडीच तास भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमले होते. मात्र, केवळ 30-40 जणांच्या उपस्थितीत आंदोलनास तुलनेने कमी लोक सहभागी झाले. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अपेक्षेपेक्षा लवकर आंदोलन मागे घेण्यात आले. 






निज्जर यांच्या हत्येनंतर निदर्शने करण्यात आली होती


अलीकडच्या काळात अनेक खलिस्तान समर्थक कट्टरवादींचा मृत्यू झाला आहे. गेल्या जूनमध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरला कॅनडात सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली होती. या दरम्यान, गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन तरुणांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या होत्या. निज्जरचे नाव एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होते. खलिस्तानचा प्रचार करणाऱ्या गुरपतवंत पन्नूसोबत हरदीपसिंग निज्जर काम करायचे. निज्जरच्या हत्येपासून पन्नू बेपत्ता आहे आणि आता पन्नूचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमीही व्हायरल होत आहे. याच संदर्भात हा प्रचार करण्यात आला होता. लंडनमधील निषेधाच्या एक दिवस आधी एनएसए अजित डोवाल यांनी यूकेच्या एनएसएशी संवाद साधला होता. यावेळी ब्रिटनमधील भारतीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Seema Haider : 'मी पाकिस्तानात गेले तर वाचणार नाही...', प्रियकरासाठी भारतात आलेल्या सीमाची मुख्यमंत्री योगींना विनवणी; म्हणाली...