एक्स्प्लोर
Advertisement
विद्यार्थ्यांकडून क्रूर थट्टा, प्राचार्यांना निवृत्तीभेट म्हणून कबर
पलक्कड : गुरुजनांचा आदर करणं ही प्रत्येक संस्कृतीची शिकवण मानली जाते, मात्र याला हरताळ फासत केरळच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची क्रूर थट्टा उडवली आहे. 127 वर्ष जुन्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून निवृत्ती घेणाऱ्या प्राचार्यांना काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक कबर निवृत्तीची भेट म्हणून दिल्याचा आरोप आहे.
डॉ. टी. एन. सरसू 31 मार्च रोजी संबंधित प्रख्यात सरकारी महाविद्यालयातून निवृत्त झाल्या. त्यावेळी सकाळी 7 वाजता कॉलेज कॅम्पसमध्येच आपलं थडगं बांधून त्यावर फुलांनी सजावट केल्याचं सरसू यांनी म्हटलं आहे.
भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही विद्यार्थ्यांनी आपली कबर बांधल्याची तक्रार प्राचार्यांनी पोलिसात केली आहे. तक्रारीत त्यांनी 8 विद्यार्थ्यांची नावं लिहिली असून संबंधित विद्यार्थ्यांवर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या काही अवाजवी मागण्यांना आपण भीक न घातल्याने त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केलं असावं, असं त्या म्हणतात. 'मी माझं काम प्रामाणिकपणाने करत आले, माझ्या कार्यकाळात खूप चांगलं काम झालं आहे.' अशी प्रतिक्रिया सरसू यांनी दिली आहे.
अखिल केरळ सरकारी महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या काही सदस्यांच्या आदेशावरुन संबंधित विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचा दावा सरसू यांनी केला आहे. सरसू 27 वर्ष झूऑलॉजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या, तर गेल्या शैक्षणिक वर्षात त्यांनी प्राचार्यपदाचा भार स्वीकारला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement