एक्स्प्लोर

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरुच, 54 हजार नागरिक बेघर

कोचीतल्या निवासी भागात पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलंय तर गाड्या पाण्यात अडकल्या आहे. तर पलक्कडमधील एका मंदिर अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेलं आहे.

कोची : केरळमध्ये मागील 48 तासांपासून पावसाचं थैमान सुरु आहे. या पावसात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे केरळात पूरस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील 24 बंधारे उघडण्यात आले आहेत. केरळात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वायनाडमध्ये अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान झालं आहे. k राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि अनेक मंत्र्यांसह विरोधीपक्षाच्या नेत्यांनी इडुक्की, वायनाड, कालिकट आणि कोचीचा हवाई दौरा केला. तर गृहमंत्री राजनाथ सिंह 12 ऑगस्ट म्हणजे रविवारी केरळचा दौरा करणार आहेत. अनेक ठिकाणी रेड अलर्ट पावसामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे अनेक परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायनाडमध्ये 14 ऑगस्तपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. तर इडुक्कीमध्ये 13 ऑगस्तपर्यंत इशारा देण्यात आला आहे. कोट्टायम, एर्नाकुलम, मलप्पुरम, पलक्कड, कोझिकोडेमध्ये 11 ऑगस्टपर्यंत हाय अलर्ट जारी केला आहे. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पावसामुळे नुकसान केरळमध्ये मागील 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाज पावसामुळे एवढं भीषण नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊ आणि धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अस्मानी संकटामुळे केरळचं चित्रच बदललं आहे. शेत, गावं पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून 54 हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. सैन्य आणि एनडीआरएफची मदत बचावासाठी सैन्य आणि नौदलाची पथकं तैनात केली आहेत. स्थानिकांच्या मदतीसाठी आणि रस्ते दुरुस्तीसाठी सैन्य आणि एनडीआरएफची पथकं कार्यरत आहेत. बचावासाठी 241 रिलीफ कॅम्प सुरु करण्यात आले आहेत. पाऊस आणि पुरामुळे शाळा-कॉलेज बंद पावसामुळे केरळमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा, महाविद्यालय, कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.  हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. केरळमध्ये यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा 19 टक्के जास्त पाऊस झाला आहे. याआधी 2013 साली केरळमध्ये सर्वाधिक पाऊस पडला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
अयोध्येत बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी तरुणी हिंदू निघाली; खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून लूट, 4 महिन्यांची गर्भवती, बॉयफ्रेंड राहुलसकट मुसक्या आवळल्या
अयोध्येत बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी तरुणी हिंदू निघाली; खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून लूट, 4 महिन्यांची गर्भवती, बॉयफ्रेंड राहुलसकट मुसक्या आवळल्या
Seema Haider : सीमा हैदरने सहाव्या मुलाचं केले थाटात नामकरण; पाकिस्तानला डिवचणारं नाव; पाकिस्तानला टोला लगावत म्हणाली, 'हिंदू असल्याचा सार्थ अभिमान'
सीमा हैदरने सहाव्या मुलाचं केले थाटात नामकरण; पाकिस्तानला डिवचणारं नाव; पाकिस्तानला टोला लगावत म्हणाली, 'हिंदू असल्याचा सार्थ अभिमान'

व्हिडीओ

Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Kalpana Kharat | गरिबीत पोरं वाढलेली, ती शाळेत पायी जायची, कल्पना खरातच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
US-Iran War : अमेरिकेला मोठा धक्का, F-35 विमान पाडल्याचा इराणचा दावा, पायलटला ताब्यात घेतलं, अमेरिका काय करणार?
अमेरिकेचं F-35 विमान पाडलं, पायलटला ताब्यात घेतलं, इराणचा दावा, अमेरिका आता काय करणार?  
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget