कोची : शिवसेनेच्या मॉरल पोलिसिंगविरोधात कोच्चमधील मरिन ड्राईव्हवर किस ऑफ लव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आंदोलनादरम्यान डझनभर आंदोलकांनी एकमेकांना मिठी मारत किस केलं.


आंदोलकांमध्ये केरळमधील विविध भागातून आलेल्या कलाकार, लेखक, कार्यकर्ते आणि तृतीयपंथींचा समावेश होता. हे सगळे जण मरीन ड्राईव्हवर जमा झाले आहे आणि शिवसेनेच्या स्वयंघोषित संस्कारी कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिलं.

काय आहे प्रकरण?
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 'स्टॉप लव्ह अंडर अम्ब्रेला' अशा आशयाचे फलक घेऊन कोची इथल्या मरिन ड्राईव्ह परिसरात बुधवारी मोर्चाचं आयोजन केलं होतं. यादरम्यान शिवसैनिकांनी इथे बसलेल्या तरुण-तरुणींना संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मारहाण करण्यात आली. याचा निषेध म्हणून फेसबुकवर काही लोकांच्या ग्रुपने 'किस ऑफ लव्ह' कार्यक्रमाचं आयोजन केलं.

शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना गोंधळ घातल्याप्रकरणी आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय मोर्चा काढण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे.

पोलिसांची बदली
महत्त्वाचं म्हणजे पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. घटनेवेळी ड्यूटीवर असलेल्या आठ पोलिसांची बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी कोच्चीमध्ये 2014 साली कोझिकोडच्या हॉटेलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीविरोधात ‘किस ऑफ लव’ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

आदित्य ठाकरेंकडून विरोध
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कोचीमधील प्रकाराचा निषेध केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर निषेध नोंदवला आहे.
"केरळच्या कोचीमधील घटना अतिशय लाजिरवाणी आणि अनावश्यक होतं. शिवसेना अशा कृत्यांची पाठराखण करणार नाही. या प्रकारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं आहे, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

https://twitter.com/AUThackeray/status/839785669744459776

https://twitter.com/AUThackeray/status/839785982681501697