एक्स्प्लोर

दहशतवाद्यांनो, उरी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही : मोदी

तिरुवअनंतपुरम : "दहशतवाद्यांनो, उरी हल्ला भारत कधीही विसरणार नाही," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. "भारत दहशतवादासमोर कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही," अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला खडसावलं. उरी हल्ल्यानतंर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं.  केरळच्या कोळीकोडमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. 'जे बलुचिस्तान, गिलगिटला सांभाळू शकत नाही, ते काश्मीरवर दावा करत आहेत' यावेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानवर चांगलाच घणाघात केला. "जे लोक बलुचिस्तान, गिलगिट, पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना सांभाळू शकत नाहीत, ते काश्मीरवर दावा करत आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या नेत्यांना जाब विचारावा, जे जवळ आहे, ते सांभाळण्याचा सल्ला द्यावा. तसंच पाकिस्तानची जनता त्यांच्या सरकारविरोधात, दहशतवादाविरोधात आवाज उठवेल, तो दिवस दूर नाही," असंही मोदी म्हणाले. 'भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो, पाकिस्तान दहशतवादी' "आशियातील एक देश रक्तपात करत आहे, पाकिस्तान जगभरात दहशतवाद निर्यात करत आहे. शेजारच्या देशाने निर्यात केलेल्या दहशतवादांमुळे आमचे 18 जवान धारातीर्थी पडले. पाकिस्तानी जनतेने त्यांच्या सरकारला विचारावं, दोन्ही देश एकत्र स्वंतत्र झाले, पण भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो, तुम्ही दहशतवादी. मात्र आम्ही जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडणार आहे," असा निर्धारही मोदींनी बोलून दाखवला. '18 जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही' उरी हल्ल्यातील आमच्या 18 जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमच्या जवानांनी मागील काही महिन्यात 110 दहशतवाद्यांचा खात्मा केला. आम्हाला देशाच्या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे, त्यांच्या त्यागाचा अभिमान आहे मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पाकिस्तानची जनता त्यांच्या सरकारविरोधात, दहशतवादाविरोधात आवाज उठवेल, तो दिवस दूर नाही : नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडणारः मोदी पाकिस्तानी जनतेने त्यांच्या सरकारला विचारावं, दोन्ही देश एकत्र स्वंतत्र झाले, पण भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो, तुम्ही दहशतवादी : मोदी दहशतवाद्यांनो कान देऊन ऐका, आम्ही उरी हल्ला कधीही विसरणार नाही : पंतप्रधान मोदी भारत दहशतवादासमोर कधीही झुकला नाही, ना कधी झुकणार : पंतप्रधान मोदी आशियातील एक देश रक्तपात करत आहे, पाकिस्तान जगभरात दहशतवाद निर्यात करत आहे, पंतप्रधान मोदी बरसले भाजप बहुमताने येईल, असा विचारही केला नव्हता, जनतेने भाजपला देशाची सेवा करण्याची संधी दिली : नरेंद्र मोदी भाजपचं सरकार गरीब जनतेला समर्पित : नरेंद्र मोदी भारतासह जगात केरळवासियांना आदरभाव : नरेंद्र मोदी आखाती देशांच्या दौऱ्यात मला तिथे काम करत असलेल्या माझ्या केरळच्या लोकांना भेटायचं होतं : नरेंद्र मोदी उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच जाहीर सभा

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Embed widget