kerala high court news : आता आपण जी बातमी वाचणार आहात ही कुठलीही फॉरवर्ड पोस्ट नाही. तर हे आहे केरळ हायकोर्टाचं मत आहे. हे आहे आजच्या तरुणाईच्या लग्नासंदर्भातील हे मत असून यानिमित्तानं आता एक वेगळीच चर्चा होऊ लागली आहे. 'आजची तरुण पिढी लग्नाकडे वाईट दृष्टिकोनातून पाहते. कोणतीही जबाबदारी आणि कर्तव्य न करता मोकळे आयुष्य जगायचे असेल तर लग्न न केलेलेच बरे, असे त्यांना वाटते. पूर्वी 'WIFE' चा शब्दाचा अर्थ ‘Wise Investment For Ever’ असा होता. आता तरूण पिढी याकडे ‘Worry Invited For Ever’ म्हणून पाहते', असं मत केरळ हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.  


पतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती ए मुहम्मद मुश्ताक आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केलं आहे. खंडपीठानं म्हटलं आहे की, 'यूज अँड थ्रो' संस्कृतीमुळं विवाह आणि नातेसंबंध खराब झाले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप कल्चरही त्यामुळे वाढत आहे.
  
या प्रकरणात पतीनं कोर्टात अर्ज दाखल केला होता. यात त्यानं म्हटलं होतं की, पत्नी माझ्यासोबत वाईट वागते. सतत माझ्यावर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेते. सोबतच मला तिनं मारहाण देखील केली आहे. मात्र हे आरोप पत्नीनं फेटाळले आहेत. 


आजची पिढी स्वार्थीपणामुळे आणि विवाहबाह्य संबंधांमुळे नाती तोडते


केरळ हायकोर्टानं म्हटलं आहे की, गॉड्स ऑन कंट्री म्हणून ओळखले जाणारे केरळ हे कौटुंबिक नातेसंबंधांसाठी प्रसिद्ध होते. पण आजची पिढी स्वार्थीपणामुळे आणि विवाहबाह्य संबंधांमुळे नाती तोडते. मुलांची काळजी घेत नाही. यामुळं अनेक परिवार उद्ध्वस्त झाली आहेत. समाजात भांडण करणाऱ्या जोडप्यांची, आई-वडिलांविना वाढणारी मुलांची आणि घटस्फोटित लोकांची संख्या वाढत आहे. यामुळं त्याचा समाजातील शांततेवरही परिणाम होतो आणि तो सामाजिक विकासातही अडथळा ठरतो, असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. 
 
संशय घेणं पत्नीचं नॉर्मल वागणं, त्याला क्रूरता म्हटलं जाऊ शकत नाही

कोर्टानं म्हटलं आहे की, जर पत्नीकडे संशय घेण्यासाठी ठोस कारण असेल तरच ती प्रश्न विचारते. आपलं दु:ख जाहीर करते. त्याला अबनॉर्मल बिहेवियर म्हटलं जाऊ शकत नाही. हा कुठल्याही पत्नीचं नॉर्मल वागणं आहे. याला क्रूरता म्हटलं जाऊ शकत नाही. याचा आधार घेऊन कुणी घटस्फोट घेऊ शकत नाही.  


इतर महत्वाच्या बातम्या


Maternity : मातृत्व लाभ देण्यासह महिलांच्या करिअरला मातृत्वामुळे बाधा येणार नाही याची खात्री करा; केरळ उच्च न्यायालय


Kerala High Court : "अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, पालक म्हणून जन्म दाखल्यावर फक्त आईचे नाव लिहिण्याचा अधिकार