तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा सत्ता आली आहे.  केरळात मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मंत्रिमंडळात  नव्या चेहऱ्यांना स्थान दिली आहे. कोविडच्या यशस्वी हाताळणीबद्दल ज्या के के शैलजा यांचं जगात कौतुक झालं, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही.


पी. विजयन यांच्या कॅबीनेटमध्ये एमवी गोविंदन, के. राधाकृष्णन, केएन बालगोपाल, पी. राजीव, वीएन वासन, साजी चेरियन. वी. सिवानकुट्टी, मोहम्मद रियाज, डॉक्टर आर. बिन्दू, वीना जॉरज और वी. अब्दुल रहमान या नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. तर सीपीएमच्या राज्य समितीने दिलेल्या माहितीनुसार के के शैलजा यांच्यासह मागील कॅबीनेटमधील सर्व मंत्र्यांना हटवण्यात आले आहे. 


केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने आश्चर्य


के के शैलजा या भौतिकशास्त्राच्या शिक्षिका होत्या.  कोविडच्या यशस्वी हाताळणीबद्दल केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा  यांचे कौतुक करण्यात आले होते.  त्यामुळे के के शैलजा या केरळचा चेहरा बनल्या होत्या. त्यामुळे त्यांची वर्णी मंत्रिमंडळात न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केरळमध्ये पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड आहे. परंतु हे सर्व रेकॉर्ड तोडत एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळालं. 


केरळमध्ये 140 जागांवर निवडणुका झाल्या त्यापैकी एलडीएफला 99 जागा मिळाल्या. त्यातील सीपीआईएम 62 और सीपीआईला 17.  केके शैलजा यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना श्रेय जाते.  के के शैलजा या  शैलजा टीचर नावानेही ओळखल्या जातात. 


 केरळमध्ये भाजपनं विजयासाठी खूप मेहनत घेतली होती. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी केरळमध्ये प्रचार केला होता मात्र तिथे भाजप अद्याप खातंही उघडू शकलेला नाही.  मुख्यमंत्री पिनराई विजयन आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले. भाजपने या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. केरळमध्ये भाजपची जादू चालली नाही.