Coronavirus India Cases : कोरोना व्हायरस महामारीनं देशात थैमान घातलं आहे. अशातच देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, काल देशात 4329 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. तर चार लाख 22 हजार 436 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देशात 19 एप्रिल 2021 नंतर पहिल्यांदाच एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 19 एप्रिल 2021 रोजी देशात दोन लाख 59 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 52 लाख 28 हजार 996
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 15 लाख 96 हजार 512
एकूण सक्रिय रुग्ण : 33 लाख 53 हजार 765
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 78 हजार 719
आतापर्यंत झालेलं एकूण लसीकरण : 18 कोटी 44 लाख 53 हजार 149


9 राज्यांच्या 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची बैठक 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 9 राज्यांच्या 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत आणि चंदिगढच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. या दरम्यान, त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. 


आजच्या या बैठकीत तमिळनाडू, कर्नाटक, आसाम, गोवा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, एमपी, उत्तराखंडमधील जिल्हाधिकारी, चंडीगडचे प्रशासकीय अधिकारी आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी 20 मे रोजी देशाच्या 10 राज्यांच्या 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. 


राज्यात काल नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज


राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. काल (सोमवारी) तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर काल नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान काल 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :