एक्स्प्लोर

केरळ पूर : आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक लोक बेघर

केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत.

तिरुअनंतपुरम : महापुरामुळे केरळमध्ये हाह:कार माजला असून, त्यात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. हवामान विभागाने केरळमधील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. भीषण पुरात आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलं आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. केरळ पूर : आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक लोक बेघर आतापर्यंत साडेआठ हजार कोटींचंं नुकसान केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत. दिल्ली, पंजाब, तेलंगणा या राज्यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर भारतीय रेल्वेकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. केरळ पूर : आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक लोक बेघर देशातील इतर राज्यांकडून मदतीचा हात गेल्या 100 वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा, 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचं अर्थसहाय्य जाहीर केलं असून तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारने याआधीच शंभर कोटी दिले असून लागेल तेवढी मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. केरळ पूर : आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक लोक बेघर गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवलं! राष्ट्रीय बचाव पथकांसोबत भारतीय नौदलाचे शेकडो जवान पूरग्रस्त भागात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. याच बचावकार्यातील एक व्हिडीओ नेव्हीने ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी एका गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवले आहे. या व्हिडीओमध्ये महिलेला दोरीच्या साहाय्याने पुराच्या भागातून हेलिकॉप्टरमध्ये ओढण्यात आले आहे. या  महिलेला जवळील संजीवनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. वेळीच डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत ऑपरेशन केले. यानंतर महिलेनं बाळाला जन्म दिला. केरळ पूर : आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक लोक बेघर पंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल दरम्यान, केरळातील या भीषण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिरुअनंतपुरम विमानतळावर दाखल झाले. केरळचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्र्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. मोदींकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लवकरच मोठी मदतही जाहीर होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून नियम अधिक कडक होणार, प्रवास करताना नेमकी काय काळजी घ्यावी?  
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून नियम अधिक कडक होणार, प्रवास करताना नेमकी काय काळजी घ्यावी?  
भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  
भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget