Kerala : चांगलं काम केलं म्हणून आणि बराच काळ कंपनीचा भाग असणाऱ्या कर्मचाऱ्याला काही कंपन्या भेटवस्तू किंवा बोनस देतात. केरळमधील (Kerala) बिझनेस मॅननं त्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नुकतीच खास भेटवस्तू दिली. ही भेटवस्तू एखादी साधी वस्तू नाहीये तर लग्झरी कार आहे. गेल्या 22 वर्षांपासून एके शाजी (AK Shaji) यांच्यासोबत सीआर अनिश (CR Anish) हे काम करत आहेत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी मर्सिडीज-बेंझ जीएलए क्लास 220 डी ही लग्झरी कार त्यांना देण्यात आली आहे.
एके शाजी हे डिजिटल रिटेल स्टोअर MyG चे मालक आहेत. त्यांच्या या कंपनीमध्ये अनिश हे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत. ब्लॅक कलरची लग्झरी कार अनिश यांच्या कुटुंबाला गिफ्ट देतानाचा फोटो शेअर करून शाजी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्रिय अनी... गेल्या 22 वर्षांपासून तू माझ्याबरोबर चांगलं काम करत आहेस. आशा आहे की, तुला ही तुझी नवी क्रूझिंग पार्टनर आवडेल.'
कार गिफ्ट करताना शाजी यांनी सांगितले, 'अनिश हा कर्मचारी नाही तर बिझनेस पार्टनरसारखा आहे. मला खूप आनंद होत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. '
अनिश हा MyG या कंपनीची स्थापना होण्यापूर्वी पासून शाजीशी जोडला गेला आहे. त्याने मार्केटिंग, मेन्टेनेन्स आणि विकास या विभागात काम केले आहे. तो उत्तर केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात राहतो. गिफ्ट घेतल्यानंतर अनिश म्हणाला, 'हे सर्वांच्या सपोर्टमुळे झाले आहे. सर्वजण असेच पाठिशी राहतील, अशी आशा आहे. '
हे देखील वाचा-
- Hyundai Kia Car Fire Risk : Hyundai Kia चा ग्राहकांना शॉक! 5 लाख कारना आग लागण्याचा धोका
- कार प्रेमींसाठी खुशखबर! नवीन Baleno ची बुकिंग सुरु, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha