Kedarnath Dham Viral Video: केदारनाथ धाम यात्रेला (Kedarnath Yatra) गेलेल्या एका प्रेमी युगुलाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये मुलगी केदारनाथ मंदिरासमोरच आपल्या प्रियकरावर प्रेम व्यक्त करत आहे, तिने मंदिराच्या आवारातच आपल्या बॉयफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या तरुणीने गुडघ्यावर बसून केदारनाथ (Kedarnath) मंदिरासमोरच बॉयफ्रेंडला प्रपोज केलं, तिच्या प्रियकरानेही पिवळा शर्ट परिधान केला होता. धार्मिक स्थळावर केलेल्या या प्रकारावर अनेक जणांनी प्रखर टीका केली आहे. धार्मिक स्थळांवर होत असलेल्या अशा प्रकारांमुळे नेटकरी संतापले आहेत. मंदिराच्या आवारात असं काही करणं चुकीचं असल्याचं काहींचं म्हणणं आहे.
सोशल मीडियावर प्रेमी युगुलाने त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला आणि सर्व स्तरातून टीकेची झोड सुरू झाली. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी धार्मिक भावनेला धक्का पोहोचवल्याचा आरोप केला आहे. तर व्हीडिओच्या कमेंटमध्ये काहीजण म्हणतात की, ही मुलीची चूक नाही, तर अशा ठिकाणी फोन आणण्यासच मनाई केली पाहिजे. तर, तरुणांनी अशी कृत्य करताना एकदा विचार करायला हवा, असं काहींचं म्हणणं आहे.
मंदिराच्या आवारात अशी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून अनेक लोकांनी या घटनेवर टीका केली आहे. अनेक सोशल मीडिया व्लॉगर आणि रील बनवणारे लोक धार्मिक संस्कृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.
केदारनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार तिवारी यांनी म्हटलं की, केदारनाथमध्ये बीकेटीसीला मंदिर परिसरात मोबाईलवर बंदी घालण्याची गरज आहे. भाविकांमधून अशा घटनांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हीडिओमध्ये दिसणारी महिला विशाखा नावाची ब्लॉगर आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर (@ridergirlvishakha) ही रील शेअर केली आहे. ज्यामध्ये सर्व काही प्लॅननुसार घडल्याचंही ती सांगते. मॅचिंग कपडे, अंगठीचा आकार आणि प्रवासाचा प्लॅम असं सर्व परफेक्ट होतं, असं ती म्हणते. भोलेनाथांच्या आशीर्वादाने माझं स्वप्न पूर्ण झाल्याचंही ती म्हणाली.
या मुलीने शनिवारी पोस्ट केलेल्या व्हिडीओवरुन अजूनही वाद सुरुच आहे. 36 सेकंदाच्या क्लिपमध्ये पिवळे कपडे परिधान केलेले प्रेमी युगुल मंदिराच्या आवारात भोलेनाथाला प्रार्थना करताना दिसत आहेत. तेव्हाच ती मुलगी तिचा एक हात मागे घेते आणि ठरल्याप्रमाणे कोणीतरी तिच्या हातात एक छोटा अंगठीचा बॉक्स ठेवतो, ज्यानंतर ती फिल्मी स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसते आणि प्रियकराला प्रपोज करते. मुलाचे डोळे उघडल्यावर हे चित्र पाहून त्याला धक्का बसतो, ती मुलाला अंगठी घालते आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात.
हेही वाचा:
Phone Launched: फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra लॉन्च; लूक आणि फिचर्स आहेत दमदार