एक्स्प्लोर

दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण

माजिदचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शरण येण्यासाठी दबाव टाकला. त्याच्यासाठी सोशल मीडियाद्वारे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम सुरु होती.

श्रीनगर : दहशतवादी संघटनेत सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद इरशाद खानने गुरुवारी रात्री 11.30 वाजता आत्मसमर्पण केलं. तीन दिवसांपूर्वी माजिद लष्कर-ए-तोयबा या संघटनेत सामील झाला होता. सध्या तो अवंतीपोरामध्ये व्हिक्टर फोर्सच्या ताब्यात आहे. जिल्हास्तरीय फुटबॉलपटू असलेला माजिद मूळचा अनंतनागचा रहिवासी आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांच्या पायाखालून जमीनच सरकली होती. माजिदचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शरण येण्यासाठी दबाव टाकला. त्याच्यासाठी सोशल मीडियाद्वारे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम सुरु होती. अखेर त्याने स्वत:च दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं. फेसबुक पोस्टमधून संकेत माजीद इरशाद खानने 29 ऑक्टोबरला फेसबुक पोस्टद्वारे एका दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे संकेत दिले होते. 'शौक ए शहादत मनात असताना, फासावर लटकायला काय घाबरायचं,' असं त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. माजिद खान नववीपासून लोकल फुटबॉल क्लबचा सदस्य होता. Footballer_Terrorist एके-47 सोबतचा फोटो व्हायरल अनंतनागच्या बॉईज डिग्री कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेणारा माजिद सादिकाबाद परिसरात राहतो. दहशतवादी संघटनेत सामील होण्याआधी माजिद एका सामाजिक संस्थेसोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करत होता. या संस्थेत तो इमर्जन्सी हेड होता. मागील शुक्रवारी एके-47 सोबतचा माजिदचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर हा युवा फुटबॉलपटू लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाल्याचं स्पष्ट झालं. मित्राच्या अंत्यसंस्कारानंतर दहशतवादी संघटनेत त्याचा मित्र यावर नासिर यंदाच्या जुलै महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. या संघटनेत सामील झाल्यानंतर केवळ 15 दिवसांतच म्हणजे 3 ऑगस्टला सुरक्षारक्षकांसोबतच्या चकमकीत त्याचा खात्मा झाला होता. माजिद यावरच्या अंत्यसंस्काराला गेला होता, त्यानंतर स्वत: लष्कर ए तोयबामध्ये सहभागी झाला. आईची आर्त साद सोशल मीडियावर सुरु असलेल्या मोहीमेच्या व्हिडीओत आई माजीदला परत येण्याचं आवाहन करत आहे. "परत ये आणि आमचा जीव घे, त्यानंतर निघून जा. कोणासाठी तू मला सोडून निघून गेलास?" अशी आर्त साद आई व्हिडीओमध्ये देत आहे. मात्र आता माजिद परतल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget