एक्स्प्लोर

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला भारतात, 118 वर्षांच्या करतार कौर यांचा विक्रम

पंजाबच्या करतार कौर या हयात असलेल्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत. 118 वर्षीय करतार कौर यांच्या नावाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे.

लुधियाना : जगातील सर्वात वयस्कर महिला ठरण्याचा मान भारतीय महिलेने पटकावला आहे. पंजाबच्या करतार कौर या हयात असलेल्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत. त्या 118 वर्षांच्या आहेत. करतार कौर यांच्या नावाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे. आतापर्यंत जपानच्या काने तानाका सर्वात वयोवृद्ध महिला मानल्या जात होत्या. काने यांचं वय 116 वर्ष 63 दिवस इतकं आहे. मात्र करतार कौर त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत. भावाच्या वयावरुन करतार यांचं वय काढण्यात आलं. करतार यांचा जन्म 1901 साली झाला होता. आपली पणजी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला असल्याची आपल्याला कल्पना होती, मात्र तिला दृष्ट लागू नये, यासाठी आपण ही गोष्ट लपवून ठेवल्याचं त्यांच्या पणतूने सांगितलं. काही दिवसांपूर्वी करतार यांच्या ह्रदयात ब्लॉक असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर फिरोजपूरमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्र सिंह कूका यांनी करतार यांच्यावर हार्ट सर्जरी केली. सध्या करतार यांची प्रकृती स्थिर आहे. सर्वात वयोवृद्ध व्यक्तीवर पेसमेकर इम्प्लान्ट करण्याचा विक्रमही डॉक्टरांच्या टीमने केला आहे. करतार यांनी आपल्या नातवंडांची नातवंडं म्हणजेच पाच पिढ्या पाहिल्या आहेत. त्यांची मुलगी 88 वर्षांची आहे. करतार या पूर्णपणे शाकाहारी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
Embed widget