नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर ( Karpoori Thakur) यांना देशातील सर्वाच्य पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 


बिहारमध्ये जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असताना केंद्र सरकारने कर्पूरी ठाकुर यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं आहे. 


 






कोण आहेत कर्पूरी ठाकुर? (Who Is Karpoori Thakur) 


कर्पुरी ठाकुर हे बिहारच्या सर्वच राजकीय पक्षांना आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे ओळखले जातात. बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकुर हे अतिशय सन्माननीय नाव आहे. 


कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावा झाला. 1952 मध्ये ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि 1988 पर्यंत ते 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते.


कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी तळागाळातील समाजाला शिक्षण मिळावं यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणांना हात घातला. त्यामुळे बड्या जमीनदारांकडून भूमीहिन दलितांकडे जमिनीचं हस्तांतर झालं. 


मुलीच्या लग्नाची रंजक कथा


कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भत्त्याशिवाय कोणाकडून एक पैसाही जादा घेतला नाही. आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक रंजक गोष्ट त्याच्या मुलीच्या लग्नाची आहे. कर्पूरी ठाकूर 1970 ते 71 या काळात मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना आपल्या मुलीसाठी मुलगा शोधण्यासाठी रांचीला जावे लागले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत वाहन न वापरता टॅक्सी करून रांचीला गेले. 


कर्पूरी ठाकुर यांच्या मुलीचं लग्न अगदी साधेपणाने झालं. त्यांनी त्या लग्नासाठी कोणत्याही नेत्याला किंवा त्यांच्या मित्रांना आमंत्रित केले नाही. इतकं की मुख्यमंत्र्यांसोबत राहणारे सुरक्षा कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनातील कुणीही त्या लग्नासाठी उपस्थित नव्हते.


कर्पूरी ठाकूर इतके दिवस आमदार आणि मुख्यमंत्री राहिले पण त्यांना गाडीही घेता आली नाही.


ही बातमी वाचा: