Manoj Jarange Patil :  शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी बच्चू कडू यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली. तसेच कडू यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला. बच्चू कडू यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी असे जरांगे म्हणाले. जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरावं लागते. समाजाने आणि शेतकऱ्यांनी रास्ता जाम करून टाकायला पाहिजे असे जरांगे म्हणाले.  

Continues below advertisement


बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती


मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा. आपण शेतकऱ्यांचे मुलं आहोत, इथं जात पाथ आणू नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 
बच्चू कडू जीवाची बाजी लावत आहेत. उपोषण करताना त्रास काय असतो ते मला माहिती आहे. चेहऱ्यावर जाऊ नका, त्रास खूप असतो. नाइलाजाने ते हसत बोलत राहतात. मी सल्ला देऊन जातोय. ते आराम करतायेत असं समजू नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.


शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्याची संधी 


शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्याची संधी आहे. बच्चू कडू उपोषणाला उठाव करण्यासाठी बसले आहेत. शेतकऱ्यांनो सगळे रस्ते जाम करा. बच्चू भाऊसाठी फक्त एक दिवस. पूर्ण रस्ते जाम करा. हात जोडून विनंती आहे सगळे बच्चू कडू यांच्यामागे उभे रहा असे आवाहन जरांगे यांनी केले. एक बैठक घ्या एक दिवस ठरवा आणि पूर्ण राज्य बंद नाही केलं तर माझं नाव मनोज जरांगे नाही असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांशीवाय दुसरं आहे कोण? सगळे शेतकरीच आहेत. आमदार, खासदार, मंत्री, डॉक्टर, शिक्षक सगळे शेतकरी आहेत असेही ते म्हणाले. मी विनंती करतो की, बच्चू भाऊची तब्बेत खराब होत आहे. एक दिवस ठरवा सगळे बंद करा, एक दिवस रस्त्यावर उतरा असे कडू म्हणाले. 


शेतकऱ्यांनी एक बैठक घ्यावी आणि एक तारीख ठरवून पूर्ण राज्य बंद करावं, शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बंद करावा असेही मनोज जरांगे म्हणाले. सगळ्यात वाईट परीस्थिती विदर्भ आणि मराठवाड्याची आहे. यांनी जर ठरवलं तर काहीही होईल. फडणवीस साहेब जर बच्चू कडू यांना काही झालं तर मी आहे हे लक्षात ठेवा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?