न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला आणि स्पेसेक्सचे सीईओ आणि अब्जधीश एलन मस्क यांच्यामध्ये सोशल मीडियामध्ये पोस्ट वॉ रंगलं होतं. अखेर एलन मस्क यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. एलन मस्क यांच्याकडून या वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतली जात आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन मस्क म्हणाले की " मला गेल्या आठवड्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या पोस्ट संदर्भात पश्चाताप होतोय. मी काही जादा बोलून गेलो.
वाद कसा सुरु झाला?
एनल मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग ब्यूटीफुल बिलावर टीका केली होती. हे बिल खर्चिक असल्याची टीका एलन मस्क यांनी केली होती, त्यामुळं राजकोषीय तोटा वाढेल आणि DOGE च्या प्रयत्नांना अयशस्वी करेल, असं वक्तव्य एलन मस्क यांनी केलं होतं.
एलन मस्क यांनी सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ही वक्तव्य केली होती. ही मुलाखत एलन मस्क यांच्या सरकारी अस्थायी कार्यकाळाच्या शेवटच्या दोन दिवसात प्रसारित झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प यानी सुरुवातीला यावर शांत राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर ओवल ऑफिसमध्ये पत्रकारांसोबत चर्चा करताना ट्रम्प यांनी एलन मस्क यांच्यावर नाराजी व्यक्त केली. मस्क यांनी निराश केल्याचं ते म्हणाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर एलन मस्क यांनी बिग ब्यूटीफुल बिल नसून बिग अग्ली स्पेडिंग बिल आहे, असं म्हटलं होतं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु झालं होतं. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर एलन मस्क यांनी एक्स वरुन ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला होता. एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिग ब्यूटीफुल बिलासंदर्भात कोणती माहिती नव्हती ते बिग अग्ली स्पेडिंग बिल म्हटलं पाहिजे, असं मस्क म्हणाले होते.
एलन मस्क यांच्या वक्तव्यांमुळं खवळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांच्या कंपन्यांना दिलेली शासकीय कंत्राटं रद्द करण्याची धमकी देखील दिली. यानंतर एलन मस्क यांनी स्पेसेक्स च्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टला डीकमिशन करु असं म्हटलं. हे अमेरिकेतली एकमेव यान आहे ज्यातून अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जाऊ शकतात आणि तिथून परत येऊ शकतात.मस्क यांच्या टेस्ला, स्पेसेक्स आणि स्टारलिंककडून काही सरकारी योजनांमध्ये भूमिका बजावली जातेय.
एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी दोघांवेळी मैत्री झाली होती. एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी एलन मस्क यांनी 277 ते 288 दशलक्ष डॉलरची देणगी दिली होती. एलन मस्क सर्वात मोठे देणगीदार ठरले होते. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांना डीपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सीचं प्रमुख नियुक्त केलं होतं. DOGE ची निर्मिती सरकारी खर्चात कपात करण्यासाठी करण्यात आली होती.