Karnataka : कर्नाटकात (Karnataka) लवकरच सहा नवीन "हाय-टेक" शहरे आणि एक स्टार्टअप पार्कचे निर्माण करणार आहे, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavraj Bommai) यांनी काल बेंगळुरू येथे केली. बोम्मई म्हणाले, कर्नाटकातील कलबुर्गी, म्हैसूर, मंगळुरु, हुबळी-धारवाड आणि बंगळुरूजवळ सहा "हायटेक" शहरे बांधली जातील. "बेंगळुरू जवळचे शहर विमानतळाच्या (Banglore Airport) अगदी जवळ असेल आणि ते सुनियोजित असेल, तसेच सर्वोत्तम विद्यापीठे आणि R&D केंद्रे असतील," बोम्मई म्हणाले. नवीन शहरांचा सविस्तर आराखडा सहा महिन्यांत समोर येईल, बोम्मई यांनी आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात सांगितले की, "स्टार्टअप पार्क" एक "मल्टी-मॉडल" असेल, जो विविध क्षेत्रांतील नवोदित उद्योगांसाठी उपयुक्त ठरेल 


 


देशाच्या विकासात कर्नाटकचे मोठे योगदान
मागील आठवड्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा कर्नाटक दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. आणि म्हणाले की, देशाच्या विकासात कर्नाटकचे मोठे योगदान आहे. भारताची ओळख जगभरात स्टार्टअप म्हणून होत आहे, ज्यामध्ये भारताची ही ओळख मजबूत करण्यात बेंगळुरूचा मोठा वाटा आहे. ते म्हणाले, स्टार्टअप म्हणजे केवळ कंपनी नसते. स्टार्टअप हा विश्वास आहे, देशासमोरील प्रत्येक आव्हान सोडवणे हे देखील गरजेचे आहे. असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, बंगळुरू विमानतळाजवळील नॉलेज सिटी, सायन्स सिटी आणि टेक सिटीचा समावेश असेल, यामध्ये सर्वोत्तम संशोधन, विकास केंद्रे तसेच इतर उद्योग असतील. बोम्मई पुढे म्हणाले की, भविष्यात संवर्धन करण्यासाठी नवकल्पना तयार केल्या पाहिजेत.


अॅग्रीटेक ते एरोनॉटिकल तंत्रज्ञानापर्यंतची क्षेत्रांची पूर्तता


मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी म्हणाले की, "आम्ही कर्नाटकात सहा नवीन शहरे बांधत आहोत कारण मी अतिशय सुनियोजित नवीन हायटेक शहरांचे स्वप्न पाहत आहोत, संपूर्ण कर्नाटकात सहा नवीन शहरे बांधली जातील, हे पार्क अॅग्रीटेक ते एरोनॉटिकल तंत्रज्ञानापर्यंतच्या क्षेत्रांची पूर्तता करेल. येत्या सहा महिन्यांत या उद्यानाचा आराखडा तयार करण्यात येईल, यामुळे, टेक समिटला एक चांगला प्रतिसाद मिळेल. बोम्मई म्हणाले, 'राज्यातील ज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी राज्य सरकार सहा नवीन हाय-टेक शहरे राज्यभरात स्थापन करणार आहे.' ही शहरे सुनियोजित आणि उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण असतील. तसेच ते माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करतील. या सहा शहरांचे बांधकाम सहा महिन्यांत सुरू होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.