Karnataka Minister Audio Leak : कर्नाटकचे कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी ( jc Madhuswamy) यांची एक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. मधुस्वामी यांच्या या ऑडिओमुळे कर्नाटक भाजपात एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकात सरकार काम करत नसून 2023 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप फक्त काही गोष्टी सांभाळत आहे. सरकार काम करत नाही, आम्ही ते कसेतरी हाताळत आहोत, असे मधुस्वामी यांनी म्हटले आहे. या ऑडिओ क्लिपमुळे कर्नाटकात मोठा वाद निर्माण झालाय.
कर्नाटक सरकारमधील कायदा मंत्री मधुस्वामी आणि चन्नापटना येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाले आहे. कर्नाटकातील व्हीएसएसएन बँकेच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांननी मधुस्वामी यांच्याकडे शेतकऱ्यांची तक्रार केली होती. यावेळी मधुस्वामी म्हणाले, "आम्ही इथले सरकार चालवत नाही, आम्ही फक्त पुढचे सात ते आठ महिने कसे तरी हाताळत आहोत.
ऑडिओमध्ये सहकारमंत्र्यांचा उल्लेख
सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांनी मधुस्वामी यांच्याकडे त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याच्या कथित निष्क्रियतेबद्दल तक्रार केली आहे. "मला हा विषय माहित आहे. मी एस टी सोमशेकर (सहकार मंत्री) यांना याबाबत कळवले आहे. ते कारवाई करत नाहीत. काय करावे? असा प्रश्न मधुस्वामी यांनी उपस्थित केलाय. दोघांधील या संभाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सहकारी मंत्र्यांकडून टीका
मधुस्वामी यांच्या या संभाषणामुळे त्यांच्यावर सहकारी मंत्र्यांकडून जोरदार टीका होत आहे. मंत्री मुनीरत्न यांनी मधुस्वामी यांच्यावर टीका केलीय. "असे वक्तव्य करण्यापूर्वी मधुस्वामी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. ते स्वत: सरकारचा भाग आहेत आणि प्रत्येक विषयावर मंत्रिमंडळात सहभागी होत आहेत, त्यामुळे त्यांचाही सरकारमध्ये वाटा आहे. जबाबदार पदावर असताना अशी वक्तव्ये करणे योग्य नाही, ते त्यांच्या ज्येष्ठतेला शोभणारे नाही. असे मुनीरत्न यांनी म्हटले आहे.
सहकार मंत्री एसटी सोमशेखर यांनी देखील मधुस्वामी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय, मधुस्वामी यांचे हे मत चुकीचे आहे. मधुस्वामींना वाटत असेल की ते एकमेव बुद्धिमान व्यक्ती आहेत, तर त्यांनी प्रथम ही गोष्ट त्यांच्या डोक्यातून काढून पाहिजे, असे सोमशेखर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या