Karnataka Bribe Case : कर्नाटकात गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप आमदार एम विरुपक्षप्पा यांच्या मुलाला 40 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. तेव्हापासून आमदार मदल विरुपक्षप्पा फरार होते. आता हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे हिरोसारखे जल्लोषात स्वागत केले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमदार आपल्या गाडीत बसले आहेत आणि आजूबाजूला लोकांनी गर्दी केली आहे. हातात बॅनर घेऊन लोक घोषणा देत आहेत. आमदार आपल्या आलिशान कारमध्ये बसले आहेत. हसत हसत हात हालवत लोकांना अभिवादन करत आहेत. यावेळी फटाकेही फोडण्यात आले. मादल वीरूपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदाल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी लाच घेताना अटक केली असून वीररुपक्षप्पा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
काय प्रकरण आहे?
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आमदाराचा मुलगा प्रशांत कुमार हा बेंगळुरू पाणी पुरवठा आणि सीवरेज बोर्ड (BWSSB) चे मुख्य लेखा अधिकारी होता. एका प्रकरणात 40 लाख रूपयांची लाच घेताना प्रशांत याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) च्या कार्यालयातून रंगेहात अटक केली. ही कंपनी म्हैसूर सँडल साबण बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीच्या कार्यालयातून चलनी नोटांनी भरलेल्या किमान 3 बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटकातील सोप्स आणि डिटर्जंट्स लिमिटेडचे अध्यक्ष होते.
यानंतर त्याच्या घरावरही छापा टाकण्यात आला तेथून नोटांचं भलं मोठं घबाड सापडलं. प्रकरण चिघळल्यानंतर आमदारांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते फरार होते. त्यामुळी युवक काँग्रेसने त्यांच्या बेपत्ता झाल्याची पोस्टर्स राज्यभर चिकटवली. येत्या काही महिन्यांत कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने बोम्मई सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
घरी सापडलं घबाड
भाजप आमदाराच्या (BJP MLA) ज्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं, त्याच मुलाच्या घरी धाड टाकल्यानंतर आमदारपुत्राच्या घरी नोटांचं घबाड आढळून आलंय. कर्नाटक भाजपाचे आमदार एम विरुपक्षप्पा यांचे पुत्र प्रशांत यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही लाच घेण्याचं काम थेट आमदारांच्या कार्यालयातच चालू असल्याचं समोर आलं आहे. ही लाच आमदारांसाठीच घेतली जात असल्याचाही दावा केला जातोय. लोकायुक्तांच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने त्यांना 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर प्रशांत यांच्या घरी धाड टाकण्यात आली. तिथे सहा कोटी रुपयांची रोकड आढळली. प्रशांत यांच्या घरी सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या