एक्स्प्लोर

राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल: 2008 सालचा विजय, 2013 सालचा पराभव आणि 2018 साली पहिल्या क्रमांकाचा पक्ष या सर्वांमधील समान धागा म्हणजे बी एस येडियुरप्पा होय.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल :बंगळुरु : सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाच वाजेर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी नऊ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. आज येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. आता येत्या 10 दिवसात त्यांना बहुमत सिद्ध करायचं आहे. यापूर्वी भाजपने 2008 मध्ये पहिल्यांदा विजय मिळवत, दक्षिणेत पदार्पण केलं होतं. मात्र 2013 मध्ये भाजपने हे राज्य गमावलं. आता पुन्हा 2018 मध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. 2008 सालचा विजय, 2013 सालचा पराभव आणि 2018 साली पहिल्या क्रमांकाचा पक्ष या सर्वांमधील समान धागा म्हणजे बी एस येडियुरप्पा होय. कोण आहेत बी एस येडियुरप्पा? बूकानाकेरे सिद्दलिंगाप्पा येडियुरप्पा म्हणजेच बी एस येडियुरप्पा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात झाला. 75 वर्षीय येडियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. राईस मिलमध्ये क्लार्क ते मुख्यमंत्री अशी येडियुरप्पांची कारकीर्द आहे. त्यांच्या चढ्या कारकिर्दीला जेलवारीचा ब्रेकही लागला. मात्र त्यातूनही त्यांनी कमबॅक केलं. राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री १. मांड्या जिल्ह्यातील कारपेट तालुक्यातील बुकानाकेरे गावात 1943 साली जन्म २. भात मील (rice mill) मध्ये क्लार्कचं काम करायचे. ३. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव म्हणून काम ४. 1972 मध्ये जनसंघाचे तालुका अध्यक्ष होते ५. 1975 मध्ये आणीबाणीत 45 दिवसांचा कारावास ६. 1983 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले, शिकारीपुरा मतदारसंघातून सात वेळा विजय. (यंदाचा धरुन आठ) ७. 1988 मध्ये कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष ८. 1994 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता बनले, 1999 साली निवडणूक हरले पण विधानपरिषदेतून आमदार. ९. 2004 मध्ये पुन्हा जिंकले आणि विरोधी पक्षनेता बनले, तेव्हा काँग्रेसचे धरमसिंह मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा आणि जनता दल सेक्युलरच्या कुमारस्वामी यांनी ते सरकार खाली खेचलं, 20-20 महिने विभागणी झाली. भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले, येडियुरप्पा उपमुख्यमंत्री, पण त्यांची टर्म संपल्यावर कुमारस्वामींनी येडियुरप्पांना पाठिंबा देण्यास नकार दिला आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून सातच दिवसात राजीनामा द्यावा लागला. १०. 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली. भाजपने जिंकलेलं दक्षिणेतलं हे पहिलं राज्य ठरलं. येडियुरप्पा भाजपचे दक्षिणेतील पहिले मुख्यमंत्री बनले. ११. खाण आणि जमीन घोटाळ्याच्या/भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन 2011 साली मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. १२. लोकायुक्तांच्या हस्तक्षेपामुळे जमीन घोटाळ्यात ऑक्टोबर 2011 साली अटक झाली, तेव्हा ते 23 दिवस जेलमध्ये होते. त्यानंतर 2012 मध्ये हायकोर्ट मग सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला. १३. 2012 मध्ये येडियुरप्पांनी आमदारकीचा आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. 2013 च्या निवडणुकांत भाजपच्या पराभवाला हातभार लावला. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजपमध्ये पक्ष सामील करुन घरवापसी केली. १४. 2014 साली शिमोगा लोकसभा मतदारसंघातून साडेतीन लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून खासदार बनले. १५. 2016 मध्ये पक्षाने त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पाठवलं आणि मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget