Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसचं 'किंग', भाजपचा दारुण पराभव, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Karnataka Assembly Election Result 2023 Live Updates : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकच्या जनतेनं कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकला ते आज स्पष्ट होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 May 2023 02:05 PM
Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसचंच 'किंग'

Karnataka Election 2023: आतापर्यंत काँग्रेस-129, भाजप-63 आणि जेडी(एस)-22 आघाडीवर आहेत, तर अंतिम निकालात काँग्रेसनं 4 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्या आहेत.

Karnataka Election 2023: कर्नाटक भाजपच्या हातून कसं निसटलं? खुद्द भाजप नेत्यानं सांगितलं

Karnataka Election 2023: कर्नाटकातील भाजपचे राज्यसभा खासदार लहारसिंह सिरोया यांनी एबीपी न्यूजवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आलेत. त्यामुळेच सरकारचे अनेक मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. आम्ही योग्य उत्तर देऊ शकलो नाही. तिकीट वाटपात अडचण निर्माण झाली. गुजरात मॉडेल स्वीकारायला हवं होतं, नव्या लोकांना संधी द्यायला हवी होती."

Karnataka Election 2023: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण?

Karnataka Election 2023: कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सलीम अहमद यांनी एबीपी न्यूजवर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील आहेत. कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूनं वातावरण निर्माण करण्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मोठा वाटा आहे. 

Karnataka Live: 1000 पेक्षा कमी फरकानं 16 जागांवर भाजप-काँग्रेसचे उमेदवार मागे-पुढे

Karnataka Live: 1000 पेक्षा कमी फरकाने 16 जागांवर उमेदवार मागे-पुढे




  • 1000 पेक्षा कमी मतांचा फरक असलेल्या 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

  • 1000 पेक्षा कमी मतांचा फरक असलेल्या 5 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

  • जेडीएस 2 जागांवर आघाडीवर आहे जिथे मताधिक्य 1000 पेक्षा कमी आहे.

  • 1000 पेक्षा कमी फरक असलेल्या 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.


Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसचं 'किंग'; काँग्रेसला भाजपपेक्षा 7 टक्के जास्त मतं

Karnataka Election 2023: निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, काँग्रेस 122 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप केवळ 71 जागांवर आघाडीवर आहे. तर JDS 24 जागांवर पुढे आहे. मतांच्या बाबतीतही काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसला भाजपपेक्षा सात टक्के जास्त मतं मिळाली आहेत. 

Karnataka Election Results: कर्नाटकात काँग्रेसचं वादळ, दिल्ली ते बेंगळुरूपर्यंत जल्लोष

Karnataka Election Results: कर्नाटक विजयाचा संदेश देण्यासाठी देशभरातील प्रदेश काँग्रेस कार्यालयांमध्ये जल्लोषाची तयारी सुरू आहे. कलांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत.

Karnataka Result 2023: निवडणूक आयोगाच्या मते, ट्रेंडमध्ये काँग्रेस 118, भाजप- 75, जेडीएस- 24

Karnataka Result 2023: निवडणूक आयोगाच्या मते, ट्रेंडमध्ये काँग्रेस 118, भाजप- 75, जेडीएस- 24



Karnataka Result 2023: "भाजप मुक्त दक्षिण भारत"; काँग्रेस नेत्यांचा आनंद गगनात मावेना

Karnataka Result 2023: कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा विजय पाहून नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले, "भाजप मुक्त दक्षिण भारत"

Yashomati Thakur on Karnataka Election 2023: कर्नाटकच्या जनतेनं भाजपला चपराक लावली; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर

Yashomati Thakur on Karnataka Election 2023: कर्नाटक जनतेनी भाजपला चपराक लावली, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया 

Bhagwat Karad on Karnataka Election 2023: आम्हाला अजूनही आशा आहे, कर्नाटकात भाजप नक्कीच बहुमातापर्यंत पोहचेल : भागवत कराड

Bhagwat Karad on Karnataka Election 2023: निवडणुकीचा निकाल येत असताना काँग्रेस आघाडीवर आणि भाजप पिछाडीवर असलं तरी, निवडणुकीत जोपर्यंत शेवटच्या बूथवरील मतमोजणी होत नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही. आम्हाला अजूनही आशा आहे, कर्नाटकात भाजप नक्कीच बहुमातापर्यंत पोहचेल आणि भाजपचं सरकार येईल, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे. 

Bhaskar Jadhav on Karnataka Election: आजचा कर्नाटकचा निकाल हा देशाला एक नवा दिशा देणारा : भास्कर जाधव
Bhaskar Jadhav on Karnataka Election: आजचा कर्नाटक चा निकाल हा देशाला एक नवा दिशा देणारा आहे. सर्व मतदारांचे अभिनंदन. जिंकून आलेल्या उमेदवारांचंही अभिनंदन, मलिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांचं अभिनंदन.

भाजप हटाव संविधान बचाव, भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव, त्यामुळे एक वेगळी दिशा या निकालानंतर देशाला देण्यात आली आहे. 


Karnataka Election 2023: भाजप आमदारांचा घोडेबाजार करु शकतं; काँग्रेसचा आरोप

Karnataka Election 2023: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, 'आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार नक्कीच स्थापन होईल. इतर पक्षांसोबत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

Karnataka Chunav 2023: अपक्ष उमेदवारांची पहिली प्रतिक्रिया

Karnataka Election 2023: कर्नाटकातील गौरीबिदानूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार केएच पुट्टास्वामी गौडा 11,000 मतांनी आघाडीवर आहेत. एबीपी लाईव्हवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका दाखवत, निकाल आल्यावर बोलू, असं त्यांनी सांगितलं. 

Karnataka Chunav 2023: कर्नाटकात भाजपला अजूनही आघाडीची आशा

Karnataka Chunav 2023: दिल्ली भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "आता जे कल येत आहेत ते आमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. पण आणखी काही फेऱ्या मोजल्यावर परिस्थिती स्पष्ट होईल."

Karnataka Chunav 2023: कर्नाटकात भाजपला अजूनही आघाडीची आशा आहे

Karnataka Chunav 2023: दिल्ली भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "आता जे कल येत आहेत ते आमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. पण आणखी काही फेऱ्या मोजल्यावर परिस्थिती स्पष्ट होईल."

Karnataka Results 2023: काँग्रेस नेते डीके शिवकुमार समर्थकांसह निवडणूक निकाल पाहताना

Karnataka Results 2023: काँग्रेस नेते डीके शिवकुमार समर्थकांसह निवडणूक निकाल पाहत आहेत


Karnataka Results 2023: निपाणीमधून शशिकला जोल्ले पुन्हा आघाडीवर तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तम पाटील पिछाडीवर

Karnataka Results 2023: निपाणीमधून शशिकला जोल्ले पुन्हा आघाडीवर तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तम पाटील पिछाडीवर


बेळगाव उत्तरमध्ये काँग्रेस आघाडीवर राजू शेठ यांनी घेतली आघाडी

Vijaypur Election Results 2023: विजयपुरातील परिस्थिती काय?

Vijaypur Election Results 2023: विजयपुरातील परिस्थिती काय? 


शहर मतदारसंघ



  • बसवनगौडा पाटील ( भाजप) 35724

  • अब्दुल हमीद मुश्रीफ (काॅंग्रेस) 18676
    आघाडी (भाजप) - 17048 


इंडी  मतदारसंघास



  • यशवंतरायगौडा पाटील (काॅग्रेस)*37437

  • बी.डी. पाटील (निजद)*27826

  • आघाडी (काँग्रेस) - 9611


बबलेश्वर मतदारसंघ



  • एम.बी. पाटील (काॅंग्रेस)  43349

  • विजूगौडा पाटील (भाजपा) 34932

  • आघाडी (काँग्रेस) - 8417


सिंदगी मतदारसंघ



  • अशोक मनगोळी (काॅंग्रेस) 33180

  • रमेश भूसनूर (भाजप) 36536

  • आघाडी (भाजप) - 3356


बसवनबागेवाडी मतदारसंघ



  • शिवानंद पाटील (काॅंग्रेस) 21232

  • अप्पूगौडा पाटील मनगोळी (JDS) 21153

  • आघाडी (काँग्रेस) - 89


देवरहिप्परगी मतदारसंघ



  • सोमनगौडा पाटील (भाजप) 23368

  • राजूगौडा पाटील कुदरीसालवडगी (JDS )  33388

  • आघाडी (JDS) - 10020


मुद्धेबिहाळ मतदारसंघ



  • अप्पाजी नाडगौडा (JDS) 40427

  • ऐ.एस.पाटील नडहळ्ळी (काॅंग्रेस) 39080

  • आघाडी (JDS) - 1347


नागठाण राखीव मतदारसंघ



  • विठ्ठल कटकदोंड (काॅंग्रेस) 26006

  • देवानंद चव्हाण (JDS) 13864

  • आघाडी (काँग्रेस) - 12142



एकूण जागा : 8 
आघाडी असलेल्या जागा 
काँग्रेस - 4
भाजप - 2
JDS - 2

Karnataka Results 2023: निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्व 224 जागांचे कल

Karnataka Results 2023: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर सर्व 224 जागांचे कल दाखवले आहेत. 



काँग्रेस : 119
भाजप : 72
जेडीएस : 25
इतर : 8


Karnataka Election Results 2023: दिल्ली: AICC कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष

Karnataka Election Results 2023: कर्नाटकात पुन्हा चित्र बदलणार का?

Karnataka Election Results 2023: कर्नाटकातील सर्व जागांचे कल आले आहेत. ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी ते अंतिम म्हणता येणार नाही. कारण कर्नाटकात अशा 50 जागा आहेत जिथे काँग्रेस आणि भाजपमधील मतांचा फरक 1 हजारांपेक्षा कमी आहे. काँग्रेसच्या जागा कमी झाल्यास सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएससोबत भागीदारी करावी लागेल.



 





Karnataka Election Results 2023: काँग्रेसला कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस'ची भीती

Karnataka Election Results 2023: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, "आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केला आहे. भाजप ऑपरेशन लोटस चालवू शकतं. ज्यांनी 40 टक्के भ्रष्टाचार केला असेल त्याला तुरुंगात पाठवलं जाईल. राहुल गांधींच्या अपात्रतेचा मुद्दा निर्णायक घटक होता. "

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 आतापर्यंतचा जनतेचा कौल


Karnataka Election Result 2023 Live : निवडणूक आयोगानं 224 पैकी 223 जागांचे कल जाहीर केलेत

Karnataka Election Result 2023 Live : निवडणूक आयोगानं 224 पैकी 223 जागांचे कल जाहीर केलेत


निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्येही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. भाजपसह जेडीएसलाही झटका बसला आहे.



• काँग्रेस - 115 जागा, 43.1 टक्के मतं
• भाजप - 73 सीट, 36.2 टक्के मतं
• जेडीएस - 30 सीट, 12.8 टक्के मतं
• इतर - 5 जागा 


Karnataka Chunav 2023: काँग्रेस समर्थकांचा जल्लोष, हनुमानाला मिठाईचा नैवेद्य

Karnataka Chunav 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस समर्थकांनी एआयसीसी मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मिठाई वाटताना दिसले. तसेच, हनुमानाला मिठाईचा नैवेद्यही दाखवण्यात आला. 



 


Karnataka Election Result 2023 Live : 40 टक्के कमिशन सरकारला जनतेनं नाकारलं

Karnataka Election Result 2023 Live : काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, "संपूर्ण बहुमत आमच्या पाठीशी आहे. जनतेनं आम्हाला संधी दिली आहे. सर्व प्रकारचा प्रचार झाला पण जनतेनं आम्ही दिलेला नारा स्विकारला आणि लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही जिंकत आहोत. कर्नाटकात प्रचंड संख्येनं. 40 टक्के कमिशनचं सरकार जनतेनं नाकारलं आहे. सर्व अपप्रचार झाला पण आम्ही मुद्द्यांवर ठाम होतो आणि त्यामुळेच जनतेने आम्हाला बहुमत दिले आहे."

कर्नाटकच्या जनतेनं मोदी, शाह यांना नाकारल : संजय राऊत

Sanjay Raut : कर्नाटकातून देशाची मन की बात बाहेर पडत आहे. कर्नाटकच्या जनतेनं पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाह यांनी झिडकारलं असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकमध्ये जे झालं तेच 2024 ला देशात होईल असेही राऊत म्हणाले.  

काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग, सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार

Karnataka Assembly Election Result :  कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसची मुसंडी, दिल्लीच्या कार्यालयात आनंदोत्सव साजरा

Karnataka Assembly Election Result :  कर्नाटकमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. 

Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये काँग्रेसची मुसंडी, 135 जागांवर आघाडी

Karnataka Assembly Election Result : कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly Election Result) कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं  (Congress) जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 135 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील आघाडीवर

Karnataka Election Result : निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील आघाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले या पिछाडीवर आहेत.

बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवर

Karnataka Election Result :  बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तेथील 18 जागांपैकी काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे तर भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. 

कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत, 115 जागांवर आघाडी

 Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे. 

Election Results 2023 LIVE Updates: कर्नाटक विधानसभेचे 200 कल हाती, काँग्रेस 100 तर भाजपला 80 जागांवर आघाडी

Karnataka Assembly Election Result :  कर्नाटक विधानसभेचे 200 कल हाती आले असून काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसनं शतक पूर्ण केलं आहे. 100 जागांवर काँग्रेस आघाडीवर असून भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे. 

Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये सुरुवातीचे 150 कल हाती

Karnataka Assembly Election Result : कर्नाटक राज्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election Result) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 150 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजप 70 तर काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कल सातत्यानं बदलत आहेत.

Karnataka Assembly Election Result 2023 Live updates : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर आहेत. 

कर्नाटक विधानसभेचे 100 कल हाती, भाजप 50 तर काँग्रेसला 40 जागांवर आघाडी

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेचे 100 कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप 50 तर काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. 

कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

Karnataka Election Result :  कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. भाजप 30 जागांवर तर काँग्रेस देखील 30 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 7 जागांवर आघाडीवर आहे. 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, भाजप 10, काँग्रेस जागांवर आघाडीवर

Karnataka Election Result :   कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 10 आणि जेडीएस 4 जागांवर आघाडीवर आहे. 

थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार, बेळगावातील 18 मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष

Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बेळगावमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलंआहे. बेळगावातील 18 मतदारसंघाकडे सर्वाचं विशेष लक्ष लागलं आहे. 

कर्नाटक विधानसभा निकाल, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार

Karnataka Election Result 2023 :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सर्व 224 विधानसभा जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. यावेळी 2,615 उमेदवार रिंगणात आहेत.

कर्नाटक विधानसभेचा आज निकाल, यावेळी विक्रमी 73.19 टक्के मतदान

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यावेळी विक्रमी 73.19 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. 2018 च्या निवडणुकीपेक्षा हे प्रमाण एक टक्का जास्त आहे. बंगलोर ग्रामीणमध्ये 85 टक्के आणि जुन्या म्हैसूरमध्ये 84 टक्के मतदान झाले. निवडणूक विश्लेषक अमिताभ तिवारी यांच्या मते, जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम सत्ताधारी पक्षावर होतो.

पार्श्वभूमी

Karnataka Assembly Election Result 2023 Live updates : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. कारण आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकच्या जनतेनं कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकला ते आज स्पष्ट होणार आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील. 


कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 


2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद


विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झालं. 


बेळगावचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत येणार


बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आज दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 


सकाळी 6 वाजता मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हजर राहणार आहेत. 7.30 वाजता मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली स्ट्रॉंग रूम उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर 8 वाजता प्रथम पोस्टाने आलेली मते मोजली जाणार आहेत. 8.30 वाजता मतदान यंत्रातील मतमोजणी प्रारंभ होणार आहेत. मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या असून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात 29 मतमोजणीच्या फेऱ्या असणार आहेत. मतमोजणी केंद्राला निमलष्करी दल, सशस्त्र पोलीस आणि पोलीस अशी तीन पदरी सुरक्षा असणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.


सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही


कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे आज दुपारपर्यंत समजेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.