एक्स्प्लोर

12 मे रोजी मतदान, 15 मे रोजी कर्नाटकचा निकाल!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीपासूनच सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विविध टप्प्यांमध्ये प्रचार करत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा मैदानात आहेत. कर्नाटक विधानसभेत सध्या कुणाच्या किती जागा? काँग्रेस – 122 भाजप – 43 जेडीएस – 34 बीएसआरसी – 3 केजेपी – 2 केएमपी – 1 अपक्ष - 8 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा कर्नाटकातील निकाल कर्नाटकात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट दिसून आली होती. भाजपने कर्नाटकातील 28 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर विजय मिळवला. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं. तर जेडीएसने 2 जागा जिंकल्या होत्या. भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 41.2 टक्के आणि जेडीएसला 11.1 टक्के मतं मिळाली होती. कर्नाटकात कुणाचा किती दबदबा? यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाचा मुद्दा चर्चेत असेल. कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज असल्याचं बोललं जातं. इथे जवळपास 17 टक्के लिंगायत आहेत. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच लिंगायत कार्ड खेळत लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, ज्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा ही जुनी मागणी आहे. याशिवाय कर्नाटकात मुस्लीम आणि वोक्कालिगा समाजाचीही निर्णायक भूमिका असेल. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची कशामुळे? लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. कारण, काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षांना लोकसभा निवडणुकीअगोदर या निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावं लागेल. भाजप काँग्रेसला आणखी एका राज्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न करेन, तर काँग्रेस आपल्या हातात असलेलं एकमेव मोठं राज्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Supreme Court :इंटरनेट पूर्ववत करा,मेट्रो- रेल्वे संदर्भात 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
इंटरनेट पूर्ववत करा, 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget