नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांनी बिहार निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवावरून पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला आहे. तसेच पक्षाने कदाचित प्रत्येक निवडणूकीत पराभव होणारच हेच आपलं नशीब असल्याचं मानलं आहे, असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेरही दिला आहे. पुढे बोलताना लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा, असंही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले. दरम्यान, याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनीही बिहार निवडणुकांवरून पक्षाने विचारविनिमय करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं.


इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, 'बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेनं काँग्रेसला नाकारलं आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडलं होतं. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे.'


कपिल सिब्बल यांना तुम्हाला वाटतं का? की काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना बिहारमधील पराभव सामान्य घटना वाटतेय का? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, 'बिहार निवडणुका आणि पोटनिवडणुकांमधील निकालांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने अद्याप काहीच भूमिका समोर आलेली नाही. कदाचित त्यांना हा पराभव सामान्य वाटत असावा.' पुढे बोलताना म्हणाले की, 'मला माहीत नाही. मी केवळ माझं मत सांगत आहे. मी वरिष्ठांना काही बोलताना ऐकलं नाही. त्यामुळे मला माहिती नाही. माझ्यापर्यंत केवळ वरिष्ठांच्या आजूबाजूच्यांचा आवाज पोहोचतो. त्यामुळे मला
केवळ तेवढंच माहिती असतं.'


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.


महत्त्वाच्या बातम्या :