एक्स्प्लोर

कपिल देव यांची प्रकृती स्थिर; रुग्णालयातील फोटो समोर, चाहत्यांचे आभार

कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार आणि आतापर्यंत सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू अशी कपिल देव यांची ओळख आहे.

नवी दिल्ली: भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि ते आता सुखरुप आहेत. कपिल देव यांचा हॉस्पिटलमधील एक फोटो समोर आला आहे ज्यात ते सुखरुप असल्याचं दिसतं.

कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीमधल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले होते. या बातमीनंतर अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांनी ट्वीट करुन सांगितले की, "मी यातून लवकरचं पूर्णपणे बाहेर येईन. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद."

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर धोका टळला

कपिल देव यांना दिल्लीच्या फोर्टिज् या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली कोरोनरी अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. शुक्रवारी या वृत्ताला दुजोरा देताना हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले होते की, "61 वर्षीय कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने अॅडमिट करण्यात आले होते. त्यांची प्रकृत्ती आता स्थिर आहे." येत्या काही दिवसातच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असेही हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले आहे.

भारताचा सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू एकेकाळी कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम नावावर असलेल्या कपिल देव यांनी 1994 मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. हा विक्रम सलग सहा वर्षे त्यांच्या नावावर होता. कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने 1983 साली पहिला विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांनी भारतासाठी 131 कसोटी सामने, 225 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी अनुक्रमे 5248 आणि 3783 धावा केल्या आहेत.

कपिल देव यांचे आरोग्य चांगले राहावे आणि ते यातून लवकर बरे व्हावेत यासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंह यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Embed widget