एक्स्प्लोर
फेसबुक लाईव्हनंतर विवाहितेची नदीत उडी मारुन आत्महत्या
जसलीन गेल्या पाच वर्षांपासून सीएच्या परीक्षेची तयारी करत होती. मात्र तिच्या पदरी अपयश येत असल्याचं पतीने सांगितलं.

कानपूर : कानपूरमध्ये एका विवाहितेने गंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने फेसबुक लाईव्ह केलं होतं. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचं तिने सांगितलं. जसलीन कौर नामक महिलेने गंगा नदीत उडी मारली. त्यानंतर काही जणांनी तिला नदीतून बाहेर काढलं, मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं. जसलीन कौर मूळ जयपूरची होती. पांडुरंगनगर भागात राहणाऱ्या पवनीत सिंह नामक व्यावसायिकाशी 2011 मध्ये तिचं लग्न झालं. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. जसलीन गेल्या पाच वर्षांपासून सीएच्या परीक्षेची तयारी करत होती. मात्र तिच्या पदरी अपयश येत असल्याचं पतीने सांगितलं. बुधवारी सीएचा निकाल जाहीर झाला, मात्र ती अपयशी ठरली. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने फेसबुक लाईव्ह केलं होतं. सासू आणि सासरे यांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं तिने सांगितलं.
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?





















